हे ‘भोगी’, आमच्या ‘योगीं’कडून शिका! अमृता फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

73

राज्यात भोंग्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना गेल्या काही दिवसांपूर्वी गृहमंत्र्यांनी दिलीप वळसे पाटील यांनी बैठक देखील बोलावली होती. दरम्यान, राज्य सरकारला ३ मे रोजी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील भोंगे उतरवले. योगींच्या या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले. हे अभिनंदन करताना राज यांनी ट्वीट करत महाराष्ट्रात योगी कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे भोगी! असे म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय. तर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही नाव न घेता मुख्यमंत्र्यावर हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाल्या अमृता फडणवीस?

भोंग्यांबाबत अमृता फडणवीस यांनी गुरूवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर ट्विट करुन चांगलाच हल्लाबोल केला आहे. ये भोगी, काही तरी शिक आमच्या ‘योगीं’कडून !, असा अमृता यांनी ठाकरे यांना सल्ला दिला आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत. त्याचा संदर्भ घेत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना योगींकडून काहीतरी शिकण्याचा सल्ला दिल्याचे या ट्विटवरून दिसतेय.

(हेही वाचा – औरंगाबादमध्ये राज ठाकरेंच्या सभेला परवानगी, काय असणार अटी-शर्तीं?)

योगींचं कौतुक करत निशाणा

उत्तर प्रदेशात मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल राज ठाकरे यांनी आता योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर त्यांनी ठाकरे सरकारला जोरदार टोलाही लगावला आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट करत उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर स्तुतीसुमने उधळली आहेत. उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषतः मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे अभिनंदन आणि आभार. आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’कुणीच नाही, आहेत फक्त ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी ठाकरे सरकारवर झणझणीत टीका केली आहे.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.