शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक सुधीर मोरे (Sudhir More Suicide) यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घाटकोपर आणि विद्याविहार रेल्वे स्थानकादरम्यान ट्रेन खाली उडी घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान अद्याप आत्महत्येच कारण मात्र अस्पष्ट आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी (Sudhir More Suicide) धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. याबाबतचा अधिक तपास पोलीस करत आहेत. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
(हेही वाचा – UPI Transactions : भारतात महिन्याभरात १० अब्ज युपीआय व्यवहार )
मुंबईतील कडवट शिवसैनिक अशी ओळख असलेले आणि ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख सुधीर सयाजी मोरे (Sudhir More Suicide) यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, गुरुवारी (३१ ऑगस्ट) मध्यरात्रीच्या सुमारास सुधीर मोरे यांचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत रेल्वे ट्रॅकवर मिळाला. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, सुधीर मोरे (Sudhir More Suicide) गुरुवारी रात्री आपल्या खासगी अंगरक्षकांना बैठकीला जायचे आहे, असे सांगून बाहेर पडले. त्यांनी यावेळी आपल्यासोबत कोणालाही घेतले नव्हते. यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास घाटकोपर रेल्वे स्थानकातील फास्ट ट्रॅकवर त्यांचा मृतदेह सापडला. त्यांच्या मृत्यूविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु, अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळालेली नाही. दुपारी दोन वाजता सुधीर मोरे (Sudhir More Suicide) यांच्या निवासस्थानावरुन त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
नेमका प्रकार काय?
सुधीर मोरे (६२) हे विक्रोळी पार्क साईड परिसरात वास्तव्यास होते. गुरुवारी रात्री उशिरा सुधीर मोरे हे पार्क साईड येथील स्थानिक गणेशोत्सव मंडळाच्या बैठकीत उपस्थित होते. त्यानंतर ते बैठक संपवून निघून गेले. त्याच रात्री ११:३०वाजण्याच्या सुमारास घाटकोपर आणि विद्यविहारच्या मध्ये असणाऱ्या हवेली पुलाच्या खाली सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे रुळाजवळ सुधीर मोरे यांच्या छिन्नविच्छिन्न अवस्थेतील मृतदेह कुर्ला रेल्वे पोलिसांना सापडला.
त्यानंतर कुर्ला रेल्वे पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन मृतदेहाची ओळख पटवून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजवाडी रुग्णालयात पाठवला. पाकुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शार्दूल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेहाजवळ पोलिसांना कुठल्याही प्रकारची सुसाईड नोट मिळून आलेली नसल्यामुळे पोलिसांनी प्राथमिक तपसावरून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. परंतु मोरे यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community