Maharashtra Assembly session: नार्वेकर ज्या पक्षात जातात त्यांना..; अजित पवारांचा शिंदेंना इशारा

79

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे राहुल नार्वेकर निवडून आले. तर त्यांनी शिवसेनेच्या राजन साळवी यांचा पराभव केला. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नार्वेकरांना १६४ तर राजन साळवींना १०७ मतं मिळाली. राहुल नार्वेकर ज्या पक्षात जातात त्या पक्षातील नेतृत्वाच्या अत्यंत जवळ जातात आणि त्यांना ते आपलंस करतात. ते शिवसेनेत गेले तेव्हा आदित्य ठाकरेंना आपलंस करून टाकलं. आमच्याकडे आले तेव्हा त्यांनी मला आपलेसे केले, भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीसांना आपलंस करून घेतलं. शिंदे साहेब आता तुमचं काही खरं नाही, असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हणताच एकच चर्चा सुरू झाली.

(हेही वाचा – Maharashtra Assembly session: अध्यक्षपद भूषविताच देशभरात नाव, कोण आहेत राहुल नार्वेकर?)

पुढे ते म्हणाले, भाजपमधील जुन्या मान्यवरांची विधानसभा अध्यक्षपदाची संधी हुकल्याने मला आश्चर्य वाटले, जे मुनगंटीवार, शेलार, महाजन कुणालाच जमलं नाही ते राहुल नार्वेकरांनी ३ वर्षांत करून दाखवलं. मी तुम्हाला सुचवलं होतं, त्यांना अध्यक्ष करा, म्हणूनच त्यांना आठवण करून दिली. दरम्यान, विधिमंडळातील पहिलीच लढाई शिंदे गटाने जिंकली. शिवसेनेचा व्हिप धुडकावत शिंदे गटाने राहुल नार्वेकरांना पाठिंबा दर्शविला. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नार्वेकरांचे अभिनंदन करत एकनाथ शिंदेंना हा इशारा दिला आहे.

पवारांनी शुभेच्छा देत व्यक्त केला विश्वास

महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाल्यानतंर राष्ट्रवादीच्यावतीने अजित पवारांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ते म्हणाले, जेवढा मान असतो, तेवढीच मोठी जबाबदारी असते. त्यामुळे तुमच्या कार्यकाळात कामकाज प्रभावी होईल, अशी अपेक्षा आहे. आतापर्यंत सर्व अध्यक्षांनी न्याय देण्याचे काम केले आहे. राहुल नार्वेकरांकडून सगळ्यांना न्याय मिळेल आणि विकासाचं चाकं अधिक गतीमान होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.