पुलवामा हल्ल्याप्रकरणी जम्मू-काश्मीरच्या माजी राज्यपालांचे पंतप्रधानांवर गंभीर आरोप!

94

पुलवामा हल्ल्याचा दिवस आजही कोणताही भारतीय विसरू शकत नाही कारण या हल्ल्यात तब्बल ४० भारतीय जवान हुतात्मा झाले होते. या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यासंदर्भात भाजपच्या एका माजी राज्यपालांनी खळबळजनक दावे केले आहेत. माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘द वायर’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट करत पंतप्रधानांवर गंभीर आरोप केले आहेत.

( हेही वाचा : जपानमध्ये पंतप्रधानांच्या सभेत स्फोट! फुमियो किशिदांना सुखरूप काढले बाहेर )

माजी राज्यपालांचे खळबळजनक आरोप 

जम्मू-काश्मीरचे रुपांतर केंद्रशासित प्रदेशात होण्याआधी या राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे होते तसेच पुलवामा हल्ल्यादरम्यान सुद्धा मलिक हे राज्यपाल होते. यासदंर्भात मलिक यांनी द वायर या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली होती. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेला हा हल्ला म्हणजे केंद्रीय गृह मंत्रालयाच्या बेजबाबदारीचा परिणाम असल्याचे सत्यपाल मलिक म्हणाले. सीआरपीएफने एअरक्राफ्टची मागणी केली होती कारण एवढा मोठा ताफा रस्त्याने कधीही जात नाही राजनाथ सिंग यांच्याकडे मागणी केल्यावर त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती तर मी त्यांना एअरक्राफ्ट दिले असते, फक्त पाच एअरक्राफ्टची गरज होती असा खळबळजनक दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. हा खुलासा केल्यामुळे संपूर्ण देशभरात चर्चांना उधाण आले आहे.

तसेच आपल्या चुकीमुळे हे झाल्याचे मी पंतप्रधानांना सांगितल्यावर त्यांनी तुम्ही आता शांत राहा असे सांगितल्याचे सत्यपाल मलिक यांनी मुलाखतीदरम्यान स्पष्ट केले.

https://twitter.com/INCIndia/status/1646894499082170370

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.