शिवसेनेतील फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेल्या माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदेंनी सावंत यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा आहे.
राज्यातील आदीवासी भागात कुपोषित मुलांचे प्रमाण वाढत आहे. ते रोखण्यासाठी शासनाने काही दिवसांपूर्वी एका कृती दलाची स्थापना केली होती. माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना या कृती दलाच्या समितीचे अध्यक्षपद देण्यात आले होते. येत्या काळात सावंत यांना विधानपरिषदेची आमदारकी देऊन एखादे मंत्रिपद दिले जाईल, अशी चर्चाही होती.
(हेही वाचा – Hardik Pandya : टी-२० सामना गमावला. पण, हार्दिकने जसप्रीत बुमरा आणि अश्विनला टाकलं मागे)
मात्र, अजित पवार गटाच्या सत्ताप्रवेशामुळे शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे दीपक सावंत यांच्याकडे सध्या जबाबदारी असलेल्या कृती दलाच्या अध्यक्षपदालाच राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यात आला आहे. वित्त विभागाने तसा शासन निर्णय जारी केला आहे. त्यामुळे डॉ. सावंतांन वित्त विभागाच्या नियमानुसार शासनाच्या सर्व सोई सुविधा देण्यात येतील.
अन्य इच्छुकांचेही समाधान करणार
राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाल्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदांची आणि महामंडळाची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे इच्छुकांच्या गोटात अस्वस्थता आहे. ती दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध पर्यायांची चाचपणी सुरू केली आहे. त्यानुसार, सावंत यांच्याप्रमाणे आणखी काही इच्छुकांना अशाप्रकारे संधी देऊन राजकीय पेच सोडवण्याचा शिंदेंचा प्रयत्न असल्याचे कळते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community