राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. परंतु देशमुखांना सुटकेसाठी 10 दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. न्यायालयाने देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती दिली आहे. सीबीआय या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
‘या’ अटीशर्तींसह जामीन मंजूर
मागच्या 13 महिन्यांपासून अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. सोमवारी उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने देशमुखांना दिलासा मिळाला आहे. CBI ने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. अनिल देशमुखांना आपला पासपोर्ट तपास यंत्रणेकडे जमा करावा लागणार आहे. तपास यंत्रणा आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय त्यांना देशाच्या बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच, आठवड्यातून दोन दिवस त्यांना ईडी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. त्याचबरोबर तपास अधिका-यांना तपासात यापुढे संपूर्णपणे सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.
( हेही वाचा: संजय राऊतांना चमचा ही निशाणी द्या; शिंदे गटाच्या नेत्याची टोलेबाजी )
Join Our WhatsApp Community