महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जालन्याचे माजी मंत्री आणि शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी अखेर शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटात सामील झाल्याची घोषणा त्यांनी जालन्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन, त्यांच्याशी बोलणं करुनच मी शिंदे गटात सहभागी होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मागच्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील आक्रमक नेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटात जाणार असल्याची, चर्चा होती. आता त्यांनी स्वत: आपण शिंदे गटाला समर्थन देत असल्याचे, जाहीर केले. यावेळी ते भावूकही झाले. उद्धव ठाकरेंशी बोलणे झाले. सकाळी सविस्तर बोललो. माझ्यावर जी परिस्थिती आली आहे, त्याबद्दल सांगितले. मी त्यांच्या कानावर सर्व गोष्टी टाकल्या. राऊत, विनोद घोसाळकर यांच्याशी बोललो. मी एक सच्चा शिवसैनिक आहे. 40 वर्षांपासून मी शिवसेनेत आहे. त्यामुळे मला काही निर्णय घेणं भाग होतं. मी या सर्व गोष्टींबाबत पक्षप्रमुखांशी बोललो. काहीतरी परिस्थिती आहे म्हणून मी शिंदे गटात प्रवेश करत आहे, असे खोतकर यावेळी म्हणाले.
( हेही वाचा: “मराठी माणसाला डिवचू नका!” राज ठाकरेंचा राज्यपालांना इशारा )
Join Our WhatsApp Community