काँग्रेसचे युवा प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारीचा अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. सत्यजित तांबे यांची आता पक्षातून हक्कालपट्टी करणार असल्याचं म्हटलं जातं असून आज यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान एकीकडे काँग्रेसमध्ये हे खळबत सुरू असताना दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना राहुल गांधींना सावरकरांवर बोलण्याची गरज नव्हती, असं म्हणतं चव्हाणांनी राहुल गांधींना टार्गेट केलं आहे.
पृथ्वीराज चव्हाण नक्की काय म्हणाले?
‘केवळ यात्रेमुळे यश मिळणं अवघड आहे. निवडणुकीत यश मिळवायचं असेल तर काँग्रेसची संघटना मजबूत केली पाहिजे. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना राहुल गांधींना सावरकरांवर बोलण्याची गरज नव्हती,’ असं परखड मत पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं आहे.
पुढे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ‘नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेसची फजिती झाली आहे. काँग्रेसमध्ये निवडणूक प्रक्रियेतून लोकं निवडले न गेल्यानं हा घोळ झाला आहे.’
(हेही वाचा – राष्ट्रवादीला मोठा धक्का: ‘या’ खासदाराला १० वर्षांची शिक्षा)
Join Our WhatsApp Community