100 कोटींच्या खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेले माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी आता मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाने देशमुखांचा जामीन अर्ज नाकारल्यानंतर या निर्णयाला आव्हान देणारी याचिका देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर 11 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
देशमुखांची दिवाळी तुरुंगातच
अनिल देशमुख यांनी विशेष सीबीआय न्यायालयासाठी सुटकेसाठी जामीन अर्ज केला होता. पण हा अर्ज न्यायालयाने शुक्रवारी नाकारला. त्यामुळे देशमुख यांना दिवाळी देखील तुरुंगातच घालवावी लागली. त्यानंतर आता देशमुखांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून जामीन अर्ज दाखल केला आहे.
(हेही वाचाः फटाक्यांवरुन खोपकरांनी शिवसैनिकांना भरला दम! म्हणाले, ‘मी घुसून मारेन…’)
100 कोटींचे वसुली प्रकरण
महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री पदी असताना अनिल देशमुख यांनी गैरव्यवहार करत मुंबईतील बार आणि हॉटेल मालकांकडून 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना दिले होते. सिंग यांनी लेटर बॉम्ब फोडत याबाबतची माहिती दिल्यानंतर देशमुख अडचणीत आले. त्यानंतर त्यांच्यावर सीबीआय आणि ईडीने गुन्हा दाखल केला. तेव्हापासून अनिल देशमुख हे तुरुंगात असून आता उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Join Our WhatsApp Community