माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला. त्याप्रमाण १४ एप्रिल रोजी सकाळीच देशमुख चौकशीसाठी DRDO च्या गेस्ट हाऊस येथे दाखल झाले.
उच्च न्यायालयाने चौकशीचा दिलेला आदेश!
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्याचे होमगार्ड प्रमुख परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी निलंबित सहायक पोलीस सचिन वाझे याला 100 कोटी रुपये जमा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप सिंग यांनी केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे अनिल देशमुख यांना सीबीआयने समन्स बजावले. त्यानुसार अनिल देशमुख चौकशीसाठी हजर झाले.
(हेही वाचा : एनआयएचे पोलिस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची अचानक बदली! चर्चेला उधाण)
देशमुख यांच्या खासगी सचिवांचेही जबाब नोंदवले!
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खासगी सचिवांचेही रविवारी जबाब नोंदवण्यात आलेत. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) तपास पथकाने रविवारी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि सहाय्यक एस कुंदन यांची सुमारे चार तास चौकशी केली, त्यानंतर त्यांचे स्वतंत्रपणे जबाब नोंदविण्यात आले. त्यानंतर सीबीआयकडून अनिल देशमुख यांनाही समन्स पाठवला होता.
Join Our WhatsApp Community