अनिल देशमुखांच्या घरावर पुन्हा ईडीची छापेमारी 

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने 21 एप्रिल रोजी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग 11 तास चौकशी केली होती.

117

१०० कोटींच्या वसुली आदेशामुळे वादात सापडलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर २ महिन्यांपूर्वी ईडीने छापा मारला होता. शुक्रवारी, २५ जून रोजी ईडीने पुन्हा अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावर धडक दिली. ही दुसरी धाड आहे. देशमुखांच्या घराच्या भोवती ईडीने कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.

घराभोवती कडक बंदोबस्त!

अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. मुंबई उच्च न्यायालयानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर अर्थात प्राथमिक गुन्हा दाखल झाला आहे. ईडीने शुक्रवारी, सकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु आहे. सध्या अनिल देशमुख हे घरी नाहीत, त्यांचे कुटुंबीय घरी आहे.

(हेही वाचा : अनिल देशमुखांच्या घरी सीबीआयची धाड! लॅपटॉप, फाईल्स ताब्यात घेतल्या!)

अनिल देशमुख यावेळीही घरी नव्हते!

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने 21 एप्रिल रोजी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग 11 तास चौकशी केली होती. त्यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीाआयने गुन्हा दाखल करुन त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले होते. दरम्यान, सीबीआयने 21 एप्रिल रोजी अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह 10 ठिकाणी छापे मारले होते. आधीच्या छापेमारीच्या वेळी देशमुख घरी नव्हते, आता दुसऱ्या वेळीही अनिल देशमुख घरी उपस्थित नाहीत, देशमुख मुंबईतही नाहीत, असे समजते.

मोठी कारवाई होण्याची शक्यता!

गुरुवारी, २४ जून रोजी दिल्ल्लीत या संबंधी महत्त्वाची बैठक पार पडून मोठया कारवाईसाठी परवानगी दिल्याचे सूत्रांकडून समजते. त्यामुळे ही मोठी कारवाई कोणती, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.  देशमुख सध्या कुठेच दिसत नाही, ते कुठे आहेत, याविषयी देखील कुणाला माहित नाही, त्यामुळे देशमुखांच्या अचानक गायब होण्यानेही चर्चा सुरु झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.