राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खांद्याला दुखापत झाली आहे. शुक्रवारी ही घटना घडली होती. कारागृहात चालत असताना ते पडले आणि त्यामुळे त्यांच्या खांद्याला मार लागल्याची माहिती मिळत आहे. सध्या देशमुखांना उपाचारांसाठी जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. 1 एप्रिल रोजी सीबीआयने त्यांना ताब्यात घेतले होते. याआधी, 100 कोटींच्या वसुली आणि मनी लाँड्रिंगच्या आरोपांखाली त्यांना ईडीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अटक केली होती.
Former Maharashtra min Anil Deshmukh on Saturday admitted to hospital for surgery on his shoulder.
On April 1, CBI took custody of the former minister. He was arrested by ED in November last year in connection with extortion & money laundering allegations against him pic.twitter.com/6y078ObQbF
— ANI (@ANI) April 4, 2022
जे जे रुग्णालयामध्ये दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल देशमुखांना उपचारांसाठी शुक्रवारीच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनिल देशमुख तुरूंगामधील बाथरूममध्ये घसरून पडले. तेव्हापासून ते रुग्णालयात आहेत. आज त्यांचा MRI काढण्यात आला आहे. चालत असताना पडले आणि त्यामुळे त्यांचा खांदा डिसलोकेट झाला आहे. त्यामुळे त्यांना दुखापत झाली असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शुक्रवारी त्यांना जे जे रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. देशमुख यांना ऑर्थोपॅडिक्स विभागात उपचार दिले जात असून, त्यांच्या शारिरीक चाचण्या सुरु असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.
(हेही वाचा – तुम्हाला शांत झोप लागतेय ना…? नसेल तर ही बातमी वाचा )
काय आहे प्रकरण?
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याला प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांचे वसुली करण्याचे टार्गेट दिले होते, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी पत्रातून केला होता.तर काही दिवसांपूर्वी मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसतेय.
Join Our WhatsApp Community