मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणारे माजी महापौर आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते दत्ता दळवी (Dutta Dalvi) यांना काही अटींवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. आज म्हणजेच शुक्रवार १ डिसेंबर रोजी मुलूंड कोर्टाकडून हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
न्यायालयाची भूमिका
दत्ता दळवी (Dutta Dalvi) यांची 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली आहे. आरोपी वरिष्ठ नागरिक असून त्यांना काही आजार देखील आहेत, तसेच ते पळून जाण्याची भीती नाही म्हणून जामीन मंजूर करण्यात आल्याचं न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
(हेही वाचा – Assembly Election Exit Poll 2023 : राजस्थानमध्ये काँग्रेसला धक्का?)
या अटी-शर्थींवर दत्ता दळवींना जामीन मंजूर
१. प्रकरणाचा तपास संपण्यापर्यंत काही प्रतिबंध लागू
२. मुख्यमत्र्यांविरोधात कोणतंही अवमानकारक वक्तव्य करण्यास मनाई
३. कोणत्याही प्रकारचं प्रक्षोभक वक्तव्य करण्यास मनाई
४. पोलिसांना सहकार्य करण बंधनकारक
५. कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, याची काळजी घेणं बंधनकारक
नेमकं प्रकरण काय ?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणं ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी महापौर (Dutta Dalvi) दत्ता दळवी यांना चांगलंच भोवलं होतं. भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी (Dutta Dalvi) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे दत्ता दळवी यांना त्यांच्या विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती.
(हेही वाचा – Nashik: नाशिकमध्ये मराठी पाट्या लावण्याचे पालन नाही, आयुक्तांनी मागवला अहवाल)
उबाठा गटातर्फे रविवारी (२६ नोव्हेंबर) भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या ‘हिंदुह्रदयसम्राट’ या उपमेवरून दत्ता दळवी (Dutta Dalvi) यांनी शिवीगाळ केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल शिवीगाळ व अपमानकारक विधान केल्याप्रकरणी शिवसेनेचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार, भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्याविरोधात भादंवि कलम 153 (अ),153 (ब),153(अ)(1)सी, 294, 504,505(1)(क) अन्वये गुन्हा दाखल केला होता.” (Dutta Dalvi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community