मुंबईत माजी महापौर Datta Dalvi यांना फेरीवाल्यांकडून शिवीगाळ 

223
मुंबईत माजी महापौर Datta Dalvi यांना फेरीवाल्यांकडून शिवीगाळ 
मुंबईत माजी महापौर Datta Dalvi यांना फेरीवाल्यांकडून शिवीगाळ 

मुंबई मागील काही दिवसांपासून फेरीवाल्यांची दादागिरी मोठ्या प्रमाणात समोर येत आहे. अशीच एक घटना मुंबई उपनगरातील विक्रोळी (Vikroli) परिसरात घडली आहे. विक्रोळीत शिवसेना उबाठा गटाचे नेते व मुंबईचे माजी महापौर (Former Mayor) दत्ता दळवी (Datta Dalvi) यांना गलिच्छ भाषेत शिवीगाळ करत फेरीवाल्यांनी धकाबुक्की केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  (Datta Dalvi)

विक्रोळीतील मध्यवर्ती शिवसेना उबाठा गटाच्या शाखेजवळ असलेल्या काही फेरीवाल्यांनी रस्त्यावर जागा अडवून दुकान लावले होते. त्यामुळे रस्त्यात अडचण होत असल्यामुळे माजी महापौर दत्ता दळवी (Former Mayor Datta Dalvi) यांनी तिथले प्लास्टिकचे क्रेट बाजूला केले. यामुळे फेरीवाल्यांनी दत्ता दळवी यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. या प्रकरणाचा सिसिटिव्ही देखील आता समोर आला आहे.  (Datta Dalvi)

(हेही वाचा – Airline Hoax Threats : खोट्या धमक्यांमुळे विमान कंपन्यांचं होतंय एवढं नुकसान)

कोण आहेत दत्ता दळवी?

दत्ता दळवींनी (Datta Dalvi) आपली कारकीर्द सामान्य शिवसैनिक म्हणून केली. आपल्या आक्रमक स्वभावामुळे ते अल्पावधीतच पुढे आले आणि बाळासाहेब ठाकरेंचे विश्वासू बनले. शिवसेनेच्या विभाग क्रमांक ७ (Ward No 07) च्या विभागप्रमुखपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. तसेच २००५ ते २००७ या दरम्यान दत्ता दळवींनी मुंबईचे महापौर म्हणून काम केलं. या काळात त्यांनी आपली कारकीर्द चांगलीच गाजवली. ईशान्य मुंबईमध्ये दत्ता दळवींचा मोठा प्रभाव आहे. सन २०१८ साली दत्ता दळवींनी आपल्या विभागप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी ते चांगलेच चर्चेत आले होते. नंतरच्या काळात एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) बंड केलं आणि शिवसेनेवर दावा सांगितला. त्या काळात दत्ता दळवींनी उबाठा गटासोबत राहून त्यांची निष्ठा कायम ठेवली.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.