संजय राऊत पुन्हा अडचणीत; ठाण्यात माजी महापौरांकडून गुन्हा दाखल

104

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा खळबळजनक आरोप करत संजय राऊतांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस आयुक्तांना पत्र दिले होते. याच आरोपांनंतर राऊत मोठ्या अडचणीत सापडले असून त्यांच्याविरोधात ठाण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी बुधवारी कापूबाबवडी पोलीस ठाण्यात राऊतांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. माहितीनुसार मीनाक्षी शिंदे यांनी संजय राऊतांनी दोन गटांमध्ये वैमनस्य निर्माण केले आणि बेताल वक्तव्य केल्याची तक्रार देत हा गुन्हा दाखल केला आहे. तसेच आता ठाण्यातील मनोरुग्णालयातही राऊतांसाठी एक खाट ठेवल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

(हेही वाचा – राऊतांचा कांगावा उघड; आता त्यांच्याविरोधात होणार गुन्हा दाखल; नरेश म्हस्केंनी दिली माहिती)

प्रसार माध्यमांसोबत बोलताना मीनाक्षी शिंदे म्हणाल्या की, ‘गेल्या सात-आठ महिन्यांपासून संजय राऊत जे बेताल वक्तव्य करतायत, ते संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. राऊतांची मानसिक पातळी किती ढासळली आहे, हे त्यांच्यातून कळत आहे. जर अशा प्रवृत्तीला वेळीच ठेचले नाही तर भविष्यात आपल्या लोकांना त्याचा त्रास होईल. कारण नुसती आता वायफळ बडबड चालू आहे. भविष्यात ते रस्त्यावर फिरून लोकांना दगडी देखील मारतील, त्यामुळे हे समाजासाठी आणि लोकांसाठी घातक आहे. त्यामुळे आमच्या या ठाण्यातील मनोरुग्णालयात त्यांच्यासाठी एक खाट ठेवली आहे.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.