‘या’ माजी राज्य मंत्र्याच्या हत्येच्या सुपारीने खळबळ

134

राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्या हत्येची सुपारी दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. हंडोरे यांनी स्वतःहून टिळक नगर पोलीस ठाण्यात सुपारी देणारा आणि घेणाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी दिली आहे, राजकीय पूर्ववैमनस्यातून जीवे मारण्याची धमकी आणि हत्येसाठी सुपारी देण्यात आल्याचे काळे यांनी सांगितले .

राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आहे. चेंबूरच्या पी. एल.लोखंडे मार्ग या ठिकाणी राहणारे हंडोरे यांनी शुक्रवारी रात्री स्वतःहून टिळक नगर पोलीस ठाण्यात हजर होऊन तक्रार दिली आहे. तक्रारीत त्यांनी निलेश श्याम नानचे आणि सुपारी किलर संदीप चंद्रकांत गोरे या दोघांची नावे दिली आहे, निलेश हा चेंबूर घाटला या ठिकाणी राहणारा आहे. निलेश याचे हंडोरे सोबत जुने राजकीय वैर आहे, हंडोरे यांचे पक्षात प्रभाव असल्यामुळे आगामी मनपा निवडणुकीत त्याला तिकीट मिळणार नसल्यामुळे त्याने संदीप गोरे याला माझ्या हत्येची सुपारी दिली, तसेच मला मारण्याचा कट रचून धमकी दिल्याची तक्रार हंडोरे यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. हंडोरे यांच्या राजकीय वर्तुळातील एकाने त्याच्या ही गोष्ट कानावर टाकली. हंडोरे यांनी खात्री करून अखेर शुक्रवारी पोलीस ठाण्यात धाव घेतली अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील काळे यांनी दिली.

(हेही वाचा – ‘या’ तारखेपासून सुरू होणार NEET PG समुपदेशन, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची घोषणा)

या प्रकरणी टिळक नगर पोलिस ठाण्यात निलेश नानचे आणि संदीप गोरे यांच्या विरुद्ध कलम ११५, १२०(ब), ५०६(२) भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीचा कसून शोध घेण्यात येत असल्याची माहिती काळे यांनी दिली. हत्येसाठी किती रकमेची सुपारी देण्यात आली होती याबाबत आरोपीना अटक केल्यावर उघडकीस येईल असेही काळे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.