माजी आमदार Shahajibapu Patil यांचे कुणाल कामराला गाण्यातून प्रतिउत्तर; म्हणाले, मातोश्री के अंगण मे…

154

Shahajibapu Patil : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्यावर विडंबनात्मक कविता केल्याने राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. या गाण्यामुळे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते त्यांनी यानंतर खार येथील हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड देखील केली. दरम्यान आता शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी देखील गाण्याच्या माध्यमातून कुणाल कामराला प्रत्युत्तर दिलं आहे. (Shahajibapu Patil)

शहाजी बापू यांनी गायलेल्या गाण्याचे बोल… 

मातोश्री के अंगण मे कामरा आया
सुपारी लेके गाना गाया,
उद्धवजी को खुशी आया
लेकीन ठाणे का टायगर आँखो मे अंगार
उबाठा को खत्म करणे महाराष्ट्र के मैदान में आया

(हेही वाचा – Traffic Fines : दुचाकी चालवणार्‍यांसाठी धोक्याची घंटा! पाळा हे नियम, नाहीतर भरावा लागेल एवढा दंड)

असं गाणं शहाजी बापू पाटील यांनी म्हंटले आहे. दरम्यान कुणाल कामराच्या या विडंबनात्मक गाण्यामुळे (Satirical song) राज्यातील 14 कोटी जनतेचं मन दुखावले आहे, त्यामुळे आपन सांगोला येथे कुणाल कामराच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे बापू यावेळी म्हणाले. तसेच महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, असा कायदा पारित व्हावा यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे असेदेखील शहाजी बापू पाटील म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.