मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे, सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर ईडीकडून नॅशनल स्टॉक एक्सचेंज कथित फोन टॅपिंग प्रकरणी संजय पांडे यांच्यासह एनएसईचे माजी प्रमुख चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरुद्ध प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला. त्यांच्यामागे सीबीआय आणि ईडी दोघांकडून चौकशी सुरु होती, आता संजय पांडे यांना ईडीकडून अटक करण्यात आली.
फोन टॅपिंग प्रकरणीही गुन्हा दाखल
संजय पांडे यांच्या विरोधात यापूर्वी सीबीआयने तीन गुन्हे दाखल केले होते, तर ईडीने सुद्धा २ गुन्हे दाखल केले होते. संजय पांडे हे पोलीस खात्यातून निवृत्त होताच केंद्रीय यंत्रणेच्या रडारवर आले. एनएसईचे माजी प्रमुख रामकृष्ण हे सीबीआयच्या अटकेत असून कथित घोटाळ्या प्रकरणात त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलेले असून, दिल्ली न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीला त्यांची चार दिवसांची कोठडी दिली.त्यांच्या चौकशीनंतर पांडे यांच्या विरोधात पुरावे मिळाल्यावर त्यांना अटक करण्यात आली. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे निवृत्त झाल्यापासून त्यांच्या पाठीमागे केंद्रीय यंत्रणांचा ससेमिरा लागला. जून महिन्याच्या 30 तारखेला ते निवृत्त झाले. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांना तिस-या दिवशी ईडीची नोटीस आली होती. त्यांनी फोन रेकाॅर्ड केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यामुळे त्यांची शनिवारी सीबीआयच्या अधिका-यांनी चौकशी केली असल्याची माहिती समजली आहे.
(हेही वाचा ‘एक वर्षापूर्वी ठाकरे-मोदी भेटीत झाली होती युतीबाबत चर्चा’, राहुल शेवाळेंनी केले अनेक गौप्यस्फोट)
Join Our WhatsApp Community