देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह (Dr. Manmohan Singh Death) यांचे निधन झालं आहे. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन झाल्याने गुरुवार, 26 डिसेंबर रोजी रात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मनमोहन सिंह यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे. (Dr. Manmohan Singh)
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान प्रकृतीच्या कारणास्तव डॉ. मनमोहन सिंह हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणापासून दूर होते. 1991 साली देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळचे अर्थमंत्री मनमोहन सिंह यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली. सन 2004 साली ज्यावेळी यूपीए सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉ.मनमोहन सिंह पहिल्यांदा पंतप्रधान बनले. त्यानंतर 2009 साली ते दुसऱ्यांदा पंतप्रधान बनले.
(हेही वाचा- वांद्रे आणि वरळी लव्हग्रोव्हमधील सांडपाण्यावर तात्पुरत्या स्वरुपात Bioremediation तंत्रज्ञानाचा वापर )
डॉ. मनमोहन सिंह यांची कारकीर्द
डॉ. मनमोहन सिंह यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी पाकिस्तानमधील गाह या गावी झाला. 1947 साली फाळणीदरम्यान विस्थापित होऊन सिंह कुटुंब भारतात आले. त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. डॉ. मनमोहन सिंह यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community