शिवसेनेत पडलेली उभी फूट आता दिवसेंदिवस अधिक मजबूत होताना दिसतेय. शिंदे आणि ठाकरे यांच्यात शिवसेना कोणाची यावरून संघर्ष सुरू असताना आता हा वाद थेट न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्याकडून ठिकठिकाणी पदाधिकारी नेमून पक्षबांधणीचे काम सुरू झाले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का दिला आहे.
मंगळवारी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि नाशिक महापालिकेतील मान्यता प्राप्त म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष प्रवीण तिदमे यांनी मुंबईत दाखल होत शिंदे गटात प्रवेश केला आहे. इतकेच नाही तर प्रवीण तिदमे यांची शिंदे गटाच्या महानगरप्रमुख पदी नियुक्ती देखील करण्यात आली आहे.
(हेही वाचा – Patra Chawl Case: ईडीकडून ४ हजार पानी आरोपपत्र दाखल, संजय राऊतच दोषी)
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर शिवसेनेच्या अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी शिंदेंना समर्थन दिले आहे. काही दिवसांपूर्वीचे शिंदे गटाचे काही पदाधिकारी नाशिक महापालिकेत आले होते. त्यांनी म्युनिसिपल कर्मचारी सेना फोडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिदमे यांनी त्याचा विरोध केला होता. असे असले तरी मंगळवारी सकाळी त्यांनी समर्थकांसह वर्षा बंगल्यावर जाऊन शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर त्यांची एक वर्ष कालावधीसाठी महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community