Rajan Salvi यांचा शिवसेना उबाठा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

194
Rajan Salvi यांचा शिवसेना उबाठा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
Rajan Salvi यांचा शिवसेना उबाठा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

शिवसेनेचे माजी आमदार राजन साळवी यांनी शिवसेना उबाठा पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला असून लवकरच साळवी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता आहे. (Rajan Salvi)

(हेही वाचा- Water : मागेल त्याला पाणी; महापालिकेने सुमारे १५ हजार जलजोडण्यांना दिली परवानगी)

लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेस- राष्ट्रवादी उबाठा यांच्या महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीला जनता डोक्यावर घेईल आणि राज्यात सत्ता येईल, या भ्रमात अनेक दिग्गज नेते होते. तसाच समाज राजन साळवी यांचा झाल्याने निवडणुकीपूर्वी उबाठाकडून शिवसेनेत येणे साळवी यांनी टाळले आणि तिथेच फसले. (Rajan Salvi)

खडसे यांच्या मार्गावर?

आता साळवी यांना उबाठामधून बाहेर पडायचे आहे पण शिवसेनेकडून आता हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळेच हा पक्ष प्रवेश लांबला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. उबाठा नेतेही आता साळवी यांना पक्षात असल्याचे मानत नाहीत. पूर्वाश्रमीचे भाजपा नेते एकनाथ खडसे यांचा पक्ष प्रवेश जसा लांबला होता तसा साळवी यांचा पक्ष प्रवेश पुढे पुढे जात आहे. (Rajan Salvi)

(हेही वाचा- लीला हॉटेल ग्रूपचे संस्थापक C. P. Krishnan Nair यांच्या यशाचा चढता आलेख!)

उबाठा प्रवक्ते संजय राऊत यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषदेत, “कोण राजन साळवी?” असा उलटप्रश्न उपस्थित करत, साळवी अद्याप शिवसेना उबाठाच्या संपर्कात आहेत, असे म्हटले. (Rajan Salvi)

मात्र आता लवकरच हा पक्ष प्रवेश होईल, याबाबत हालचाली सुरू असून आठवडाभरात, नवीन प्रश्न निर्माण न झाल्यास, साळवी शिवसेनेत प्रवेश असतील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. (Rajan Salvi)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.