टक्केवारीसाठी आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मराठी ठेकेदाराची गळचेपी! मनसेने केला राडा

टक्केवारीसाठी मराठी कंत्राटदाराला काम करू न देता, शिवसेनेचे एजंट काम रद्द करण्यासाठी धमकावण्याचा फोन करत होते.

शिवसेनेचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात शिवसेनेचे पदाधिकारी मराठी ठेकेदाराला फोन करुन धमकावत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. याबाबत मनसेच्या कार्यकर्त्यांनी म्हाडा अधिकाऱ्याला जाब विचारत त्यांच्या तोंडाला काळे फासत जोरदार आंदोलन केले आहे.

काय आहे प्रकरण?

काव्या इंटरप्रायजेस या कंपनीला वरळी मतदारसंघातील १ कोटी १९ लाखांच्या कामाचं कंत्राट मिळालं होतं. त्यासाठी ८ ऑक्टोबर २०२० रोजी या कामाचे आदेश(Workorder) काढण्यात आले. तसेच शिवडी मतदारसंघात २० लाख ७१ हजारांची कामे मिळाली, या कामाच्या सिमेंट चाचणीचा रिपोर्टही ९ नोव्हेंबर २०२० रोजी प्राप्त झाला. काव्या इंटरप्रायजेसने शासनाच्या नियमांप्रमाणे ई-निविदा भरुन कंत्राट मिळवलं होतं. परंतु टक्केवारीसाठी मराठी कंत्राटदाराला काम करू न देता, शिवसेनेचे एजंट काम रद्द करण्यासाठी धमकावण्याचा फोन करत होते.

(हेही वाचा : शिवसेना आमदाराने कॉन्ट्रॅक्टरला झोडले… पण स्वतः कोरोनाचे नियम तोडले)

माजी आमदाराच्या नावाने धमकी

माजी आमदार सुनील शिंदे यांच्या नावाने धमकी देण्यात येत होती. वारंवार पाठपुरावा करुनही, म्हाडाचे अधिकारी दबावात येऊन आणि टक्केवारीसाठी मराठी कंत्राटदाराला काम दिले जात नव्हते. कंपनीने वारंवार पत्र व्यवहार करुनही म्हाडाकडून चालढकल करण्यात येत होती. यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलं.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here