शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश भोईर यांच्यावर खंडणी पाठोपाठ बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी एसीबीने भोईर यांच्या कांदिवली येथील राहत्या घराची झडती घेण्यात आली आहे. या झडतीत एसीबीने काही कागदपत्रे ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर येत आहे.
कांदिवली येथील शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक योगेश चव्हाण यांना डिसेंबर महिन्यात मुंबई गुन्हे शाखा कक्ष ११ ने खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. एस.डी कॉर्प या कंपनीकडून २५ लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप भोईर यांच्यावर करण्यात आला आहे, याप्रकरणात भोईर यांच्यासह दोन जणांना अटक करण्यात आली होती. खंडणीच्या गुन्ह्यानंतर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी गुन्हा दाखल केला. योगेश भोईर हे २०१२ ते २०१७ या कालावधीत मुंबई महानगर पालिकेवर नगरसेवक होते. या कालावधीत त्यांनी भ्रष्ट मार्गाने उत्पन्नापेक्षा जास्त अपसंपदा जमवली असल्याचा आरोप भोईर यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या कालावधीत भोईर यांनी ८५ लाख ५६ हजार ५६२ रुपये इतकी अपसंपदा संपादित केली असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.
(हेही वाचा आमच्याकडून देणगी घ्या आणि इस्लाम कबूल करा; मेरठमध्ये होळीला देणगी मागणाऱ्या हिंदूंना मुसलमानांनी छेडले)
या गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर एसीबीने सोमवारी योगेश भोईर यांच्या कांदिवलीतील राहत्या घराची झाडाझडती घेतली असून त्यात एसीबीच्या हाती काही महत्वाची कागदपत्रे मिळून आली असल्याची माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.एसीबीच्या कारवाईमुळे योगेश भोईर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community