नवनीत राणांविषयी माजी केंद्रीय मंत्र्यांचे वादग्रस्त विधान, म्हणाले…

125
माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सर्वसामान्य लोकांची दिशाभूल केली असून त्या बोगस आहेत, असे वक्तव्य मोहिते यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रविवार, १० एप्रिल रोजी अमरावतीत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना त्यांची जीभ घसरली. त्यांनी उच्च न्यायालय व एका वृत्तपत्राचा हवाला देत खासदार नवनीत राणा यांच्यावर टीकास्त्र सोडले. खासदार नवनीत राणा या बोगस आहेत, असे विधान मोहिते यांनी या कार्यक्रमात केले.

सर्वसामान्य लोकांची दिशाभूल केली 

अंबादेवी अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद बैठकीदरम्यान मंचावर उपस्थिती असलेले विविध नेते भाषण करत होते. दरम्यान माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुबोध मोहिते उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना ते म्हणाले की, कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जाऊन काम करावे. लोकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. येथे काम करण्याची संधी आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सर्वसामान्य लोकांची दिशाभूल केली आहे. माजी मंत्री सुबोध मोहिते यांनी उच्च न्यायालय व एका वृत्तपत्रातील लेखाचा हवाला देत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा बोगस असल्याची टिप्पणी केली.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.