सामूहिक बलात्काराने कुर्ल्यात खळबळ; चौघांना अटक

154
कुर्ला पूर्वेत एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना मंगळवारी, 14 जून रोजी उजेडात आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी चार जणांविरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून चौघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती नेहरू नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाबळ यांनी दिली. या चौघांना बुधवारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मेव्हणाने विकले 

पीडित विवाहिता १९ वर्षांची असून मूळची कोलकत्ता येथे राहणारी आहे. मार्च महिन्यात तिचा मेव्हणा तिला घेऊन मुंबईत आला होता, त्याने कुर्ला पूर्वेतील बर्मा सेल लाईन या ठिकाणी झोपड्यात राहणाऱ्या तिघांकडून पैसे घेऊन तिला बळजबरीने या तिघांच्या ताब्यात दिले. या तिघांनी तिच्यावर अत्याचार केला. या घटनेनंतर घाबरलेल्या विवाहितेने याची वाच्यता कुठेही केली नाही. तीन महिन्यांनी या विवाहीतेने धाडस करून शिवाजी नगर पोलीस ठाणे गाठले, मात्र हा प्रकार नेहरू नगर पोलिसांच्या हद्दीत घडल्यामुळे तिला नेहरू नगर पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले.

आरोपी अटकेत

नेहरू नगर पोलिसांनी पीडित विवाहितेची तक्रार दाखल करून मेव्हणा व इतर तिघांविरुद्ध सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करून चौघांना याप्रकरणी अटक करण्यात आली असल्याची माहिती वपोनि चंद्रशेखर भाबळ यांनी दिली. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी एकाला दोन्ही डोळ्यांनी कमी दिसत असून इतर एकाचा अपघातात हात गेला आहे. इतर दोघांना शारीरिक व्यंग असल्याचे समजते. या चौघांना बूधवारी विक्रोळी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.