अशी होती योगी सरकारची साडेचार वर्षे

सरकारने माफियांना मुळावर आपटले आहे आणि सुरक्षित राज्याचा मार्ग मोकळा केला आहे.

उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारला साडेचार वर्षे पूर्ण होत असताना, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी याप्रसंगी प्रसारमाध्यमांना संबोधित करताना सांगितले की, मागील साडेचार वर्षे हा सुशासनासाठी समर्पित असलेला “अविस्मरणीय” कार्यकाळ होता. लखनऊमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना आदित्यनाथ म्हणाले की, त्यांच्या सरकारने माफियांना मुळावर आपटले आहे आणि सुरक्षित राज्याचा मार्ग मोकळा केला आहे.

महिलांसाठी मिशन शक्ती

आम्ही गुन्हेगारांना तुरुंगात टाकले, त्यांची संपत्ती जप्त केली आणि उत्तर प्रदेशात गेल्या साडेचार वर्षांत एकही जातीय दंगल घडली नाही. आमची प्राथमिकता महिलांसाठी सुरक्षा होती आणि आम्ही सर्व रोमियो विरोधी पथके, महिलांसाठी गुलाबी बूथची स्थापना केली. सर्व आघाड्यांवर महिलांना सक्षम करण्यासाठी मिशन शक्तीचा तिसरा टप्पा सुरू केला.

(हेही वाचाः कॅप्टन अमरिंदर सिंहांची ‘लढाई’ तून माघार!)

चार लाख युवकांना नोकऱ्या

पूर्वीच्या सरकारांनी स्वत:साठी घरे बांधली, तर आमच्या सरकारने गरीबांसाठी घरे बांधली. आमच्याकडे राज्य सरकारला स्थिरतेची भावना आहे, जी मागील सरकारच्या विपरित होती. आम्ही अधिकार्‍यांना अधिक चांगले काम करण्यासाठी आणि जनतेसाठी अधिक प्रतिसाद देण्यास प्रोत्साहित केले. आमच्या सरकारने चार लाख युवकांना नोकऱ्या दिल्या आणि त्यासाठी पारदर्शक व्यवस्था उभी केली. व्यवसाय व सुलभतेच्या व्यासपीठावर राज्य क्रमवारीत वाढले आणि गुंतवणूक येऊ लागली.

राम मंदिराचे बांधकाम हे भाग्य

आपल्या सरकारच्या कर्तृत्वाची यादी करताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्याने कुंभमेळा, अयोध्येतील दीपोत्सव, मथुरेतील रंगोत्सव, गुंतवणुकदारांची शिखर परिषद आणि चौरीचौरा उत्सव आयोजित केले आणि निर्दोष व्यवस्थेसाठी प्रशंसा मिळवली. राम मंदिराचा उल्लेख करताना ते म्हणाले की, हे भाग्य आहे की आमच्या कारकिर्दीत मंदिराचे बांधकाम सुरू झाले. ज्यांनी आम्हाला मंदिराच्या बांधकामाच्या तारखेबद्दल टोमणे मारले, त्यांना गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये पंतप्रधानांनी भूमिपूजन केल्यानंतर उत्तर मिळाले.

(हेही वाचाः भाजपा नेत्यांच्या रोमारोमांत ‘मराठीद्वेष’! राऊतांचा रोखठोक वार)

कोरोना नियंत्रणात राज्य यशस्वी

आमच्या सरकारने धार्मिक स्थळे पर्यटनस्थळांमध्ये विकसित केली आहेत. आम्ही राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू केले आणि राज्याला एक्सप्रेस-वे चे जाळेही दिले. कोविड व्यवस्थापनाचे राज्याचे मॉडेल केवळ देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर मान्य केले गेले आहे. आम्ही देशात जास्तीत-जास्त चाचण्या आणि लसीकरणासह कोरोनाला नियंत्रित करण्यात यशस्वी झालो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here