Murder : अविनाश धनवे खून प्रकरणी चौघे अटकेत; विरोधी टोळीनेच केला खून

मृत धनवे आणि त्याचे तीन मित्र पंढरपूरला चालले होते. ते जेवण्यासाठी जगदंब हॉटेलमध्ये थांबले असताना हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये घुसून त्याचा खून केला होता.

364

पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे हॉटेल जगदंब येथे १६ मार्च रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अविनाश धनवे या वडमुखवाडी, चर्‍होली येथील सराईत गुन्हेगाराची हत्या (Murder) करण्यात आली होती. या प्रकारामुळे गुन्हेगारांना कायद्याचे भय राहिले आहे की नाही अशी चर्चा जनतेत सुरू झाली होती. पुणे ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि इंदापूर पोलिसांनी या प्रकरणी तातडीने हालचाल करत चौघांना अटक केली आहे.

शिवाजी बाबुराव भेंडेकर, वय ३५ वर्षे, मयुर ऊर्फ बाळा मुकेश पाटोळे वय २० वर्षे, सतिश ऊर्फ सला उपेंद्र पांडे वय २० वर्षे, सोमनाथ विश्वंभर भत्ते, वय २२ वर्षे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना पुणे कोल्हापूर महामार्गावरील शिंदेवाडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे. ते कोल्हापूरकडे पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

या प्रकरणी मृत अविनाश धनवे याची पत्नी पूजा अविनाश धनवे हिने इंदापूर पोलीसठाण्यात तक्रार दिली असून त्यावरून २७३/२०२४ क्रमांकाने भा.दं.वि.का.क. ३०२, १२० (ब), १४३, १४७, १४८, १४९, १०९ भारतीय शस्त्र अधि. कलम ३, २५,२७ म.पो.का.क. ३७(१), १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाला अखिलेश का नाही आले ? नक्की सत्य काय ?)

मृत धनवेची पार्श्वभूमी गुन्हेगारीची 

मृत धनवे आणि त्याचे तीन मित्र पंढरपूरला चालले होते. ते जेवण्यासाठी जगदंब हॉटेलमध्ये थांबले असताना हल्लेखोरांनी हॉटेलमध्ये घुसून त्याचा खून केला होता. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यामुळे याची राज्यभरात चर्चा होऊन पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तथापि, पोलिसांनी आता या प्रकरणी आरोपींना अटक केली आहे. मृत धनवे याची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. आळंदी परिसरात त्याची दहशत होती. त्याचे आळंदी परिसरातील स्थानिक गुन्हेगार टोळी सोबत वैमनस्य असल्याने त्याचा खून विरोधी टोळीनेच केला असल्याचे पोलीसतपासात पुढे आले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक संजय जाधव, रमेश चोपडे, उपाधीक्षक भाऊसाहेब ढोले, स्वप्निल जाधव, सुदर्शन राठोड,यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश शिळीमकर, इंदापूरचे निरीक्षक सूर्यकांत कोकणे स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक योगेश लंगुटे, कुलदीप संकपाळ, उपनिरीक्षक प्रदीप चौधरी, गणेश जगदाळे, अमित सिदपाटील, अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवले, राजू मोमीन, अतुल डेरे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, अजय घुले, प्रकाश वाघमारे, जनार्दन शेळके, तुषार पंदारे, विक्रम तापकीर, दिपक साबळे, संदीप वारे, बाळासाहेब खडके, राहुल घुबे, निलेश सुपेकर, अक्षय नवले, निलेश शिंदे, काशिनाथ राजापुरे, अक्षय सुपे, दगडू विरकर इंदापूर पोलीसठाण्याचे सहायक निरीक्षक प्रकाश पवार, उपनिरीक्षक गरड, अंमलदार प्रकाश माने, सचिन बोराडे, सलमान खान, नंदू जाधव, विशाल चौधर, अमित यादव, काळे, माधुरी लडकत यांनी केली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.