ईव्हीएम यंत्रात फेरफार झाल्याचे ठोस पुरावे हाती असल्याशिवाय त्याबाबत मी दोषारोप करणे योग्य ठरणार नाही. मी याच ईव्हीएम (EVM) यंत्रावर चार निवडणुका जिंकली आहे. ईव्हीएम मशीन आणि मतदार यादीतील घोळामुळे संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे. या सर्वाचा अभ्यास केला पाहिजे. या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या सगळ्या आक्षेपांमध्ये तथ्य असेल, तर त्या गोष्टी बाहेर येतील, असे शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे बुधवारी पुणे दौऱ्यावर होत्या. या वेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
(हेही वाचा – Nainital Bus Accident : नैनितालमध्ये बस 100 मीटर खोल दरीत कोसळली; 4 ठार, 21 जखमी)
विधानसभा निवडणुकीत (maharashtra assembly election 2024) महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. महाविकास आघाडीतील पक्षांकडून या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्यात आले. शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्वतः मारकडवाडी येथे जाऊन बॅलेटपेपरवर मतदान घेण्याचे समर्थन केले होते. ईव्हीएम यंत्रातील फेरफराचा मुद्द्यावरून यंत्रणेवर टीका केली जात आहे. काँग्रेसने तर थेट निवडणूक आयोगाला (Election Commission of India) पत्र लिहून याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, असे असताना सुप्रिया सुळे यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. या वेळी त्यांनी बीड आणि परभणी येथील सामाजिक अस्थिरतेविषयीही भाष्य केले.
सरकारवर केले आरोप
राज्यात घडणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना अशोभनीय आहेत. परभणीतील घटनाही निंदनीय आहे. अशा प्रकरणांमध्ये केवळ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करुन चालणार नाही. या प्रकरणांच्या मुळाशी जाऊन तपास झाला पाहिजे. राज्यात पूर्वी इतके भीतीदायक वातावरण कधीच नव्हते, आता मलाही भीती वाटू लागली आहे. चित्रपटांमध्ये जे गुन्हेगारीचे चित्र दिसते तेच आता या राज्यात पाहायला मिळत आहे, असे सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community