पी. टी. उषा, इलैराजा यांच्यासह चार जणांची राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून नियुक्ती

राज्यसभेच्या 57 जागांसाठी नुकत्याच महाराष्ट्रासह विविध राज्यांत निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्यसभेतील राष्ट्रपती नियुक्त 12 सदस्यांपैकी 4 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे हे चारही सदस्य दक्षिण भारतातील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.

या चार सदस्यांचा समावेश

अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचा झेंडा अभिमानाने उंचावणा-या धावपटू पी.टी.उषा, ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक इलैराजा, समाजसेवक विरेंद्र हिग्गाडे आणि सृजनशील क्षेत्रातील वी.विजयेंद्र प्रसाद गरू यांची नियुक्ती राष्ट्रपती नियुक्त सदस्यांमध्ये करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत या नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन केले आहे.

भारतीय संविधानातील तरतुदीनुसार भारताच्या राष्ट्रपतींकडून कला, साहित्य, समाजसेवा यांसारख्या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणा-या 12 सदस्यांची निवड संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत करण्यात येते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here