Best Bus: मतदानाच्या दिवशी बेस्टकडून दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास 

दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी बेस्ट उपक्रमाची बससेवा देण्यात येणार आहे.

157
Best Bus: मतदानाच्या दिवशी बेस्टकडून दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मोफत बस प्रवास 

लोकसभा २०२४ च्या (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या सोमवारी २० मे रोजी होणार आहे. तसेच मतदान केंद्रावर (Polling Booth) पोहोचण्यासाठी दिव्यांग, ज्येष्ठ मतदारांसाठी सरकार तर्फे विशेष बेस्ट बसची (Best Bus) सोय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मतदारांना ही सेवा मोफत (Best Bus Free Service) पुरवली जाणार असून, यासाठी कोणतेही शुल्क आकरण्यात येणार नाही. सध्या पूर्व व पश्चिम उपनगरांतील मतदारांसाठी बेस्ट सेवा उपलब्ध केली जाणार आहे. तसेच बेस्टकडून ६०० हून अधिक बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. (Best Bus)

(हेही वाचा – ऐन निवडणुकीत Sanjay Raut यांच्या अडचणींत वाढ; गुन्हा दाखल)

लोकसभा निवडणुकीत ४० टक्क्यांहून अधिक अपंगत्व (disability) असलेल्या दिव्यांग (Handicapped) आणि ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘व्होट फ्रॉम होम’ (Vote Frome Home) मतदान सुविधा दिली आहे. मात्र, ज्या मतदारांना मतदान केंद्रात जाऊन मतदान करण्याची इच्छा असेल, त्यांच्यासाठी बेस्टची सेवा दिली जाणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी ही विशेष योजना अंमलात आणली आहे.   (Best Bus)

(हेही वाचा – Rs 97 Crore House : हिरे व्यापाऱ्याने मुंबईत घेतलं ९७ कोटी रुपयांचं घर)

ज्येष्ठ नागरिकांसाठी मतदानाच्या दिवशी बस सेवा उपलब्ध केली जाणार आहे. त्यासाठी कोणत्या भागात किती ज्येष्ठ नागरिक आहेत, याची सविस्तर माहिती बेस्ट उपक्रमाला दिली जाणार आहे. तसेच मुंबई शहरात – २१२ तर मुंबई उपनगरात – ३८२ बेस्ट बसची सोय करण्यात येणार आहे. तर मुंबई उपनगरात – ३८२ तर मुंबई शहरात – २१२ व्हीलचेअर बस उपलब्ध करण्यात येणार आहेत. याशिवाय बेस्ट उपक्रमाला माहिती दिलेल्या भागात बेस्टची सेवा सकाळी मतदान सुरू होण्यापासून उपलब्ध केली जाईल. तसेच या शिवाय निवडणूक काळात निवडणूक कर्मचाऱ्यांची तसेच पोलिसांची वाहतूक करण्यासाठी ही निवडणूक आयोगाकडून बेस्ट बसगाड्यांचा उपयोग होणार आहे. (Best Bus) 

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.