Madras HC On Sanatan Dharma : भाषणस्वातंत्र्य ‘हेटस्पीच’ होता कामा नये; सनातन धर्माच्या अवमान प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

130
Madras HC On Sanatan Dharma : भाषणस्वातंत्र्य 'हेटस्पीच' होता कामा नये; सनातन धर्माच्या अवमान प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
Madras HC On Sanatan Dharma : भाषणस्वातंत्र्य 'हेटस्पीच' होता कामा नये; सनातन धर्माच्या अवमान प्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

सनातन धर्म हा शाश्वत कर्तव्यांचा समूह आहे. ज्यामध्ये राष्ट्र, राजा, आई-वडील आणि गुरूंप्रती कर्तव्य आणि गरिबांची काळजी घेणे यासह इतर कर्तव्यांचा समावेश आहे. (Madras HC On Sanatan Dharma) भाषणस्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार असला तरी, तो द्वेषयुक्त भाषणात बदलू नये. विशेषत: जेव्हा आपले विधान धर्माशी संबंधित असेल. अशा भाषणाने कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे. अभिव्यक्तीस्वातंत्र्य हेटस्पीच होता कामा नये, असे विधान मद्रास उच्च न्यायालयाने केले आहे. सनातन धर्मावर सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मद्रास उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. न्या. एन. शेषशायी यांच्या खंडपीठासमोर याविषयी सुनावणी झाली.

(हेही वाचा – Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार)

‘जेव्हा धर्माशी संबंधित बाबींमध्ये भाषण स्वातंत्र्य वापरलं जातं, तेव्हा कोणीही दुखावला जाणार नाही याची काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणजेच दुसऱ्या शब्दांत, भाषण स्वातंत्र्य द्वेषयुक्त भाषण असू शकत नाही’, असे न्यायालायने म्हटले आहे.

एक स्थानिक सरकारी कला महाविद्यालयामध्ये ‘सनातनला विरोध’ या विषयावर विचार व्यक्त करण्यास सांगितले होते. या विषयाला एलंगवन यांनी आव्हान दिले आहे. त्या प्रकरणी न्यायमूर्ती एन शेषशायी यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, ”सनातन धर्म संपूर्णपणे जातिवाद आणि अस्पृश्यता प्रदान करतो, या विचाराने जोर पकडला आहे. हे आम्ही दृढतापूर्वक नाकारतो.” (Madras HC On Sanatan Dharma)

तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात नुकत्याच केलेल्या टिप्पणीच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टाने ही टिप्पणी केली आहे. ‘सनातन धर्म म्हणजे डेंग्यू, मलेरिया, करोनासारखा रोग असून या धर्माला विरोधच नव्हे, तो नष्ट केला पाहिजे’, असे विखारी उद्गार उदयनिधी स्टॅलिन यांनी काढले होते. त्यावर टीका होऊ लागल्यावर ट्विटच्या माध्यमातून काहीशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. उदयनिधी स्टॅलिन यांनी 2 सप्टेंबर रोजी चेन्नईतील कामराजर मैदानात आयोजित ‘सनातन निर्मूलन परिषदे’त सहभागी होताना हे वादग्रस्त विधान केले होते. (Madras HC On Sanatan Dharma)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.