भारताने बांगलादेशला (Bangladesh) दिलेली महत्त्वाची ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता बांगलादेशला मोठा फटका बसला आहे. याअंतर्गत, बांगलादेशचा निर्यात माल भारतीय जमीन सीमाशुल्क केंद्रे, बंदरे आणि विमानतळांद्वारे तिसऱ्या देशांमध्ये नेण्याची परवानगी देण्यात आली. पण आता भारताने ही सुविधा रद्द केल्यानंतर, बांगलादेशचा नेपाळ, भूतान आणि म्यानमार सारख्या शेजारील देशांसोबतच्या निर्यात व्यापारावर परिणाम होऊ शकतो. भारताच्या या पावलाकडे मोहम्मद युनूस यांच्या विधानाला प्रतिसाद म्हणून पाहिले जात आहे.
बांगलादेशमधील (Bangladesh) शेख हसीना यांचे सरकार सत्तेतून गेल्यानंतर भारताचे आणि बांगलादेशचे संबंध बिघडले आहेत. काही दिवसापूर्वी, बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार मोहम्मद युनूस हे चीनमध्ये गेले होते, त्याआधी त्यांनी पाकिस्तानातील आयएसआयचे अधिकारी आणि पाक सैन्याधिकारी यांना बांगलादेशात (Bangladesh) बोलावून त्यांच्याशी चर्चा केली. मोहम्मद युनूस यांनी ईशान्य भागात चिनी अर्थव्यवस्थेच्या विस्ताराचे समर्थन केले होते.
(हेही वाचा Hawkers Action : जीपीओ ते कर्नाक बंदरपर्यंतच्या भागातील २५ अनधिकृत बांधकामांसह फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई)
त्याचाच परिणाम म्हणून भारताच्या निर्णयाकडे पाहिले जात आहे. भारताने काढलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ‘२९ जून २०२० रोजीचे परिपत्रक तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, या निर्णयामुळे कापड, पादत्राणे, रत्ने आणि दागिने यासह अनेक भारतीय निर्यात क्षेत्रांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. मोहम्मद युनूस यांनी काही दिवसापूर्वी चार दिवसांच्या चीन दौऱ्यात भारताच्या ईशान्येकडील प्रदेशाचे वर्णन लॅन्डलॉक्ड आणि समुद्रापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता नाही, असे केले होते आणि बांगलादेशला (Bangladesh) या प्रदेशाचे मुख्य प्रवेशद्वार म्हटले होते. दक्षिण आशियातील महासागराचे एकमेव संरक्षक म्हणून ढाका दर्शविताना, मुख्य सल्लागार युनूस यांनी चीनला बांगलादेशमध्ये (Bangladesh) आपली आर्थिक गुंतवणूक वाढवण्याचे आवाहन केले होते. म्हणूनच भारतानेही आता बांगलादेशासाठी ट्रान्सशिपमेंट सुविधा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने बांगलादेशच्या निर्यात व्यापारावर जबरदस्त परिणाम होणार आहे.
Join Our WhatsApp Community