G-20 summit : ममताचे जेवण काँग्रेसच्या जिव्हारी, काँग्रेसची आगपाखड; तृणमूलही भडकली

127
Lok Sabha Elections : इंडी आघाडीत बिघाडी; ममता बॅनर्जींचा 'एकला चलो' चा नारा
Lok Sabha Elections : इंडी आघाडीत बिघाडी; ममता बॅनर्जींचा 'एकला चलो' चा नारा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जी-20 शिखर परिषदेसाठी भारतात आलेल्या विदेशी पाहुण्यांसाठी दिल्लीतील प्रगती मैदानातील भारत मंडपम येथे रात्रीच्या जेवणाचे आयोजन केले होते. या डिनर कार्यक्रमाचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांनाही देण्यात आले होते, तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आमंत्रण दिले नव्हते. अशातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपतींनी आयोजित केलेल्या या डिनर कार्यक्रमामुळे काँग्रेसचे पित्त खवळले आहे.

भाजपेत्तर पक्षांच्या मुख्यमंत्र्यांनी या डिनरकडे पाठ फिरवली होती; मग ममता बॅनर्जी यांनाच का जावंसं वाटलं? की डिनरला जाण्यामागे काही वेगळे कारण आहे, असा खोचक प्रश्न लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधिर रंजन यांनी विचारला आहे. ममता बॅनर्जी यांच्याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बहुतांश राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी या भोजनाचा आस्वाद घेतला.

(हेही वाचा – Shivvastra : पंचधातूंनी साकारले छत्रपती शिवाजी महाराजांचे ‘शिववस्त्र’, लवकरच ‘तष्ट’तर्फे इंग्लंडमध्ये प्रदर्शन)

दरम्यान, इंडिया आघाडीतील पक्षाच्या नेत्यांनी डिनरला हजेरी लावणे काँग्रेसला खूप खटकले आहे. याची प्रचिती अधिर रंजन चौधरी यांनी अलिकडेच केलेल्या विधानावरून दिसून येते. चौधरी यांनी नितीशकुमार यांना तर काहीच म्हटले नाही;परंतु ममता बॅनर्जी यांच्यावर आगपाखड केली आहे. राष्ट्रपतींच्या जेवणाला जाणे एवढे आवश्यक होते का? की जाण्यामागे काही वेगळे कारण आहे? असा उपरोधिक प्रश्न चौधरी यांनी दिदींना विचारला आहे.

मुळात, मागील 60 वर्षांपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या जिभेला सत्तेची चव लागली आहे. सत्ता हातची गेल्यामुळे सर्वजण अस्वस्थ झाले आहेत. अशातच, लोकसभेच्या पुढील निवडणुकीत मोदी यांचा पराभव करून सत्तेची फळे पुन्हा चाखण्यासाठी विरोधक उतावीळ झाले आहेत. मात्र, ‘मला मिळतं की माझ्या कुत्र्याला मिळतं? अशी अवस्था विरोधकांची झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, ममता बॅनर्जी, नितीशकुमार,अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधानपदाचे डोहाळे लागले आहेत.

इंडिया आघाडीतील कोणत्याही नेत्याने पुढे-पुढे करायचा प्रयत्न केला, तर अन्य पक्षाचे नेते अस्वस्थ होतात. याच कारणामुळे नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी आता पुन्हा भाजपशी सलगी करून काँग्रेसला आरसा दाखविण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते शंतनु सेन यांनी अधिर रंजन चौधरी यांना आरसा दाखविला आहे. यावर दिदींनी कुठे जायचे आणि कुठे नाही याचा निर्णय दिदी घेतील;चौधरी नव्हे,असे प्रत्युत्तर दिले आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.