G20 Summit 2023 : पाहुण्यांना मिळणार भारतीय संस्कृतीची झलक; सोने आणि चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण

186
G20 Summit 2023 : पाहुण्यांना मिळणार भारतीय संस्कृतीची झलक; सोने आणि चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण
G20 Summit 2023 : पाहुण्यांना मिळणार भारतीय संस्कृतीची झलक; सोने आणि चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण

जी-20 परिषदेसाठी भारताची राजधानी नवी दिल्ली सजली आहे. ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. (G20 Summit 2023) भारतीय कला आणि संस्कृती दाखवणारे देखावे दिल्लीत जागोजागी पाहायला मिळत आहेत. जी-20 साठी येणाऱ्या पाहुण्यासाठी खास भारतीय पारंपारिक खाद्यपदार्थांचा बेतही करण्यात आला आहे. परदेशी पाहुण्यांना अगदी राजेशाही थाटात सोने आणि चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण वाढले जाईल.

(हेही वाचा – Kamal Hasan Supports Stalin : कमल हसन यांचे उदयनिधी स्टॅलिन यांना समर्थन; म्हणे, उदयनिधी यांना सनातनवर आपले मत मांडण्याचा अधिकार आहे)

भारतात 9 आणि 10 सप्टेंबरला जी-20 परिषद पार पडणार आहे. नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे ही परिषद पार पडणार आहे. परदेशी पाहुण्याच्या स्वागतासाठी नवी दिल्ली सज्ज झाली आहे. नवी दिल्लीमध्ये सुरक्षेची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. परदेशी पाहुण्याच्या राहण्या आणि खाण्यासाठी खास तयारी करण्यात आली आहे. जी-20 परिषदेसाठी भारतात येणाऱ्या विदेशी पाहुण्यांना सोने आणि चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण दिले जाणार आहे. तसेच त्यांच्या जेवणासाठी खास मेन्यूही तयार करण्यात आला आहे.

जी-20 परिषदेत सहभागी होणाऱ्या पाहुण्यांच्या पाहुणचारासाठी खास तयारी करण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीची झलक दाखवण्यासाठी पाहुण्यांना सोने आणि चांदी कोटेड भांड्यांमध्ये जेवण वाढले जाईल. या सर्व भांड्यांना सोने आणि चांदीचा मुलामा देण्यात आला आहे. जानेवारी 2023 पासूनच जी-20 परिषदेसाठी तयारी सुरु करण्यात आली. राजे-महाराजे ज्या प्रकारच्या ताटात जेवायचे त्या थीमच्या आधारे ही ताटे आणि इतर भांडी डिझाइन करण्यात आली आहेत. (G20 Summit 2023)

ही सर्व भांडी जयपूरस्थित मेटलवेअर कंपनी IRIS कडून पाठवली जातील. कंपनीचे म्हणणे आहे की, दिल्लीतील अनेक लक्झरी हॉटेल्सनी टेबलवेअर आणि चांदीच्या वस्तूंची ऑर्डर दिली आहे. याचा उपयोग परदेशी प्रतिनिधींना जेवण देण्यासाठी केला जाईल. IRIS चा वारसा जगातील काही प्रतिष्ठित नावांशी जोडलेला आहे. कंपनीला लीला पॅलेस, ITC हॉटेल ITC मौर्या, ताज पॅलेस, ओबेरॉय हॉटेल, द लोधी, हयात रीजन्सी, शांग्री-ला, हॉटेल अशोक यांच्याकडून ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. अनेक लक्झरी हॉटेल्सनी चांदीच्या वस्तूंची मागणी केली आहे. IRIS चे राजीव पबुवाल म्हणाले,  जी-20 शिखर परिषदेसाठी सोन्या चांदीची भांडी पुरवण्यासाठी कंपनी पूर्णपणे तयार आहे. टेबलवेअर आणि सजावटीची प्रत्येक वस्तू भारताची संस्कृती, कला आणि आदरातिथ्य दर्शवते. जी-20 शिखर परिषदेतील आमचे टेबलवेअर केवळ चांदीचे नाही, तर ते भारताच्या गौरवशाली आत्म्याचे प्रतिबिंब आहे. लक्झरी हॉटेल्स आणि ITC कंपनीची मागणी पूर्ण करण्यासाठी, IRIS ने जी-20 परदेशी प्रतिनिधींसाठी मोठ्या प्रमाणात सानुकूल टेबलवेअरचा पुरवठा केला आहे. भारत 9 ते 10 सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली येथे जी-20 शिखर परिषद आयोजित करण्यासाठी सज्ज आहे.

प्रत्येक पात्र तयार करण्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. प्रत्येक रचनेमागे वेगळा विचार असतो. ज्यामध्ये तुम्हाला भारतीयत्वाची झलक पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला भारतातील विविधतेची झलक पाहायला मिळेल. ही भांडी तयार करण्यासाठी 200 कारागिरांची मेहनत आहे. कर्नाटक, बंगाल, उत्तर प्रदेश, जयपूर, उत्तराखंड अशा विविध राज्यांतील कारागिरांनी ही भांडी बनवण्याचे काम केले आहे.परदेशी पाहुण्यांसाठी पारंपरिक पदार्थ परदेशी पाहुण्यांसाठी दिल्लीतील वेगवेगळ्या हॉटेलमध्ये खास व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्लीतील द क्लेरिजेस होटलमधील पाहुण्यांसाठी भारतीय पारंपारिक खाद्यपदार्थांचा बेत आहे. यामध्ये गुजराती आणि राजस्थानी पदार्थांचा समावेश आहे. ताज हॉटेलमधील परदेशी पाहुण्यांसाठी नान खटाई आणि गुलकंद लाडूसोबत चिकन कोरमा आणि प्रसिद्ध मासांहारी खाद्यपदार्थ असतील. (G20 Summit 2023)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.