जी-७ (G7) परिषदेनिमित्त इटलीच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी इटलीतील अपुलिया येथे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी (Georgia Meloni) यांची भेट घेतली. मेलोनी यांनी मोदी यांचं सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाल्याबद्दल अभिनंदन केलं. तसेच जी-७ (G7) परिषदेत सहभागी होण्याचं निमंत्रण स्वीकारल्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील नियमित उच्चस्तरीय संवादाबद्दल समाधान व्यक्त केलं. या द्विपक्षीय चर्चेवेळी दोघांनी भारत आणि इटलीमधील धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावाही घेतला. दोन्ही देशांमधील औद्योगिक सहकार्य वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली. (G7)
PM Modi met Italian PM Giorgia Meloni in Apulia, Italy. PM Meloni congratulated PM for his third consecutive term as Prime Minister. PM Modi thanked PM Meloni for the invitation to participate in G7 Outreach Summit and conveyed his appreciation for the successful conclusion of… pic.twitter.com/Nj20tq5Ua4
— ANI (@ANI) June 14, 2024
इटलीतील मॉन्टोन येथे यशवंत घाडगे स्मारक विकसित करणार
परराष्ट्र मंत्रालयाने दोन्ही नेत्यांमधील द्विपक्षीय चर्चेबाबत एक निवेदन जाहीर केलं आहे. यामध्ये म्हटलं आहे की, या चर्चेवेळी मोदी यांनी दुसऱ्या महायुद्धात इटलीच्या मोहिमेतील भारतीय लष्कराचं योगदान मान्य केल्याबद्दल इटली सरकारचे आभार मानले. तसेच भारत सरकार इटलीतील मॉन्टोन येथे यशवंत घाडगे (दुसऱ्या महायुद्धातील हुतात्मा योद्धे) यांचं स्मारक विकसित करणार असल्याचं जाहीर केलं. यात इटली सरकारही सहकार्य करेल. (G7)
वाढता व्यापार आणि आर्थिक सहकार्याबद्दल आनंद व्यक्त
उभय नेत्यांनी या भेटीवेळी भारत आणि इटलीतील वाढता व्यापार आणि आर्थिक सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला. स्वच्छ ऊर्जा, उत्पादन, विज्ञान आणि तंत्रज्ञान, दूरसंचार, एआय आणि खनिजांच्या क्षेत्रातील संबंध वाढवण्याचं आवाहन केलं. यासंदर्भात त्यांनी अलीकडेच औद्योगिक मालमत्ता अधिकारांबाबत एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. या घटनेचं दोन्ही नेत्यांनी स्वागत केलं. (G7)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community