Gadchiroli Naxal : गडचिरोलीत ५ तास चाललेल्या चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा, SI सह २ जवान जखमी

119
Gadchiroli Naxal : गडचिरोलीत ५ तास चाललेल्या चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा, SI सह २ जवान जखमी
Gadchiroli Naxal : गडचिरोलीत ५ तास चाललेल्या चकमकीत १२ नक्षलवाद्यांचा खात्मा, SI सह २ जवान जखमी

छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये (Gadchiroli Naxal) सुमारे 5 तासांपासून अधिक काळ चकमक झाली आहे. यात एका उपनिरीक्षकासह दोन जवान जखमी झाले आहेत. त्यांना एअर लिफ्टने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सैनिकांच्या मदतीसाठी बॅकअप फोर्सही पाठवण्यात आला आहे. दरम्यान, या ऑपरेशनबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी माहिती दिली. यात गडचिरोली पोलिसांनी 12 नक्षलवाद्यांचा खात्मा केला असल्याचे त्यांनी सांगितले.

51 लाखांच्या बक्षीसाची घोषणा

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी​​​ गडचिरोलीमध्ये असताना त्या ठिकाणी एसपी आणि आयजी यांनी या चकमक मोहिमेची माहिती दिली होती. तर रात्री उशीरापर्यंत सुमारे जवळपास 12 माओवाद्यांना मारले आहे. अलीकडच्या काळातील हे सगळ्यात मोठे ऑपरेशन आहे. गडचिरोली पोलिसांचे मी अभिनंदन करतो, त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांना 51 लाखांच्या बक्षीसही दिले जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. ते गडचिरोलीत पत्रकारांशी बोलत होते. (Gadchiroli Naxal)

परिसरात शोध मोहीम सुरू

दरम्यान, जखमी उपनिरीक्षक सतीश पाटील हे महाराष्ट्राच्या C-60 दलाचे शिपाई आहेत. त्याच्या डाव्या खांद्याला गोळी लागली. कांकेर येथील बांदा येथून त्यांना हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील कांकेर आणि गडचिरोलीच्या जंगलात ही चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलिस आणि सी-60 चे जवान गडचिरोली येथून शोधासाठी गेले होते. दरम्यान, दुपारी दीड ते अडीचच्या दरम्यान झारवंडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात नक्षलवाद्यांशी चकमक झाली. सध्या परिसरात शोध मोहीम सुरू आहे. (Gadchiroli Naxal)

शस्त्रसाठा जप्त

सी-60 पथक आणि माओवाद्यांत दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला आणि संध्याकाळी उशिरापर्यंत 6 तासांहून अधिक काळ अधूनमधून सुरू होता. परिसरात केलेल्या शोधामुळे आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत 3 एके-47, 2 आयसीएनएसएएस, 1 कार्बाइन, 1 एसएलआर यासह 7 ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. (Gadchiroli Naxal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.