उद्धव ठाकरेंना धक्का; गजानन कीर्तिकर यांचा शिंदे गटात प्रवेश

87

बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले कट्टर शिवसैनिक खासदार गजानन कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत शुक्रवारी शिंदे गटात प्रवेश केला. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिरात कीर्तिकर यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे शिंदे गटातील खासदारांची संख्या १३ वर गेली आहे.

( हेही वाचा : T20 World Cup: प्लेअर ऑफ टूर्नामेंटसाठी ९ नावे जाहीर! भारताच्या दोन खेळाडूंचा समावेश, येथे करा VOTE)

गेल्या काही दिवसांपासून कीर्तिकर शिंदे गटात प्रवेश करतील, अशा चर्चा रंगल्या होता. शिवतीर्थावरील दसरा मेळाव्यात बोलताना त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर युती करून चूक केली, ती चूक पुन्हा नको, असा सल्ला उद्धव ठाकरेंना दिला होता. त्यानंतर त्यांनी शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांची भेट घेतली. पण, लोकाधिकार समिती महासंघाच्या कार्यक्रमाला दांडी मारली. लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष असलेले कीर्तिकर कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याने लवकरच ते उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देतील, अशा चर्चा होत्या. आता कीर्तिकर शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरेंकडे केवळ ६ खासदारांचे बळ उरले आहे.

गजानन कीर्तिकर हे १९९० ते २००९ या काळात मालाड विधानसभा मतदारसंघातून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते गृहराज्यमंत्री होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गुरुदास कामत यांचा १ लाख ८३ हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता. ते सलग दोन वेळा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.