Ganesh Utsav 2024 : गणेशोत्सवातील पावित्र्य आणि धर्मजागृतीसाठी शंभराहून अधिक गणेश मंडळ आली एकत्र

मिरवणूक धुमधडाक्यात निघावी, पण नाच गाण्यातील अश्लीलता टाळावी. पारंपरिक वा‌द्याचा वापर करून उत्सवाचे मांगल्य टिकवावे, असे गणेशोत्सव मंडळानी ठरवले आहे.

98
विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनाला प्रतिसाद देत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या (Ganesh Utsav 2024) प्रतिनिधींचे एकत्रीकरण दादरच्या राजा शिवाजी विद्यालय संकुल, दादर पूर्व येथे नुकतेच घेण्यात आले. या बैठकीला मुंबईतील 117 सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. सध्याच्या काळात सार्वजनिक उत्सवातले मांगल्य संपून विकृती शिरकाव करत आहेत. त्यासाठी संवेदनशील संस्थांनी एकत्र आले पाहिजे आणि याबाबत सर्व संमतीने काही मार्गदर्शक तत्त्वांचा आग्रह धरावा, असे आवाहन परिषदेचे प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी उपस्थितांना केले. त्या आवाहनाला प्रतिसाद देत खालील सूचनांचे पालन करण्याचा ठराव सर्व संमतीने मंजूर करण्यात आला.
  • हिंदू समाजासमोरील धोक्यांबाबत (लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, मतांतरण) श्री गणेश भक्तांचे जागरण करावे.
  • उत्सवाचे (Ganesh Utsav 2024) मांगल्य पावित्र्य राखण्याचा प्रयत्न करावा.
  • श्रमाचा सन्मान करण्यासाठी आपापल्या मंडळ परिसरातील स्वच्छता कर्मचारी, लोहार काम सुतार काम, केश कर्तनालय सेवक आदी श्रमजीवींचा सत्कार करावा.
  • उत्सवाच्या काळात किमान एक दिवस फक्त अर्धा तास सकल हिंदू समाज एकत्र करून महाआरतीचे आयोजन करावे.
  • उत्सव (Ganesh Utsav 2024) काळातील श्री सत्यनारायण पूजा, श्री गणेश याग आदी कार्यक्रमात विविध जाती, पंथातील जोडप्यांना पूजेचा मान द्यावा.
  • मिरवणूक धुमधडाक्यात निघावी, पण नाच गाण्यातील अश्लीलता टाळावी. पारंपरिक वा‌द्याचा वापर करून उत्सवाचे मांगल्य टिकवावे.
  • बांगलादेशमध्ये हिंदूवर आणि मंदिरांवर झालेल्या जिहादी हल्ल्याचा फलक लावून निषेध व्यक्त करावा.

(हेही वाचा Mumbai-Goa Highway वर वाहतूक कोंडी; गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे नोकरदार खोळंबले)

यावेळी सर्व मंडळ प्रतिनिधींच्या संमतीने “सार्वजनिक उत्सव महासंघाच्या” स्थापनेची घोषणा करण्यात आली. महासंघाचे निमंत्रक म्हणून मोहन सालेकर यांनी कार्यभार सांभाळावा असे सर्वानुमते ठरले. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी बोलताना इस्कॉनचे राजेश प्रभुजी म्हणाले, “जात, पंथ, भाषा, संप्रदाय, राजकीय अभिनिवेश याच्या पलीकडे जाऊन धर्म रक्षण केले पाहिजे. धर्म टिकला तरच धार्मिक सोहळे आपण करू शकणार आहोत. आज जे बांगलादेशात, पाकिस्तानात होत आहे, ते आपल्या देशात होऊ नये असे वाटत असेल तर हिंदू म्हणून उभे राहिले पाहिजे. कार्यक्रमाला समरसता आयामाचे नरेश पाटील, बजरंग दलाचे गौतम रावरीया, विहिंपचे राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.