गुणरत्न सदावर्तेंना ११० ची नोटीस! अडचणी वाढणार

76

एसटी कामगारांच्या संपाचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. आता ते एसटीच्या बँकेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. अशातच गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात आता गावदेवी पोलीस ठाण्याने ११० अंतर्गत गुन्हा दाखला केला आहे. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणी वाढणार आहेत.

सदावर्ते यांची चौकशी होणार

याआधीही गावदेवी पोलीस ठाण्यात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात अनेक प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता त्या सर्व गुन्ह्यांची पोलीस चौकशी करू शकणार आहेत. त्यामुळे सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे सदावर्ते यांना जामीन मिळाला, तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांची भेट घेऊन पुन्हा एकदा कामगारांची संघटना स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यासाठी त्यांनी एसटीच्या बँकेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. त्याकरता त्यांनी संघटनेची स्थापनाही केली आहे. त्यामुळे आता सदावर्ते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

(हेही वाचा उद्धव ठाकरेंची हिटलरशाही! ब्रिटिशकालीन कायद्यांवर राज्य चालवतात! नवनीत राणांचा आरोप )

काय आहे कलम ११०? 

जर कोणी अपराध करण्यास चिथावणी दिली असेल आणि चिथावणी दिल्या गेलेल्या व्यक्तीने चिथावणी देणाऱ्यापेक्षा वेगळ्या उद्देशाने अगर जाणिवेने ती कृती केली असेल, तर त्या व्यक्तीला कलम ११० अंतर्गत नोटीस दिली जाते. हा गुन्हा जामीनपात्र आणि अजामीनपात्र गुन्ह्याच्या स्वरूपानुसार ठरवता येते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.