Gateway of India boat accident : मुंबई बोट अपघात कसा झाला? CM Devendra Fadnavis म्हणाले …

222
Gateway of India boat accident : मुंबई बोट अपघात कसा झाला? CM Devendra Fadnavis म्हणाले ...
Gateway of India boat accident : मुंबई बोट अपघात कसा झाला? CM Devendra Fadnavis म्हणाले ...

गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाच्या दिशेने जाणाऱ्या बोटीला (Gateway of India boat accident) दुपारी तीनच्या सुमारास धडक बसली आणि या दुर्घटनेत 13 जणांना जीव गमवावा लागला. यामध्ये तीन जण नौदलाचे कर्मचारी तर दहा जण पर्यटक आहेत. निलकमल ही प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियावरुन 120 प्रवाशांना घेऊन एलिफंटाच्या दिशेने जात होती. या बोटीला नौदलाच्या स्पीड बोटीने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (CM Devendra Fadnavis) पत्रकार परिषदेत सांगितलं.

घटनेची चौकशी मुंबई पोलीस आणि नौदल करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले, “नौदलाच्या बोटीला नवीन इंजीन लावले होते. त्या इंजिनाची चाचणी घेतली जात होते. त्या चाचणीच्या वेळी इंजीनमध्ये बिघाड झाला. त्यामुळे बोटीवरील ताबा गेला. त्यानंतर भरधाव असणारी ही बोट नीलकमल बोटीवर आदळली आणि अपघात झाला. दुर्घटनेत ज्या लोकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये देण्यात येणार आहे. या घटनेची चौकशी मुंबई पोलीस आणि नौदल करणार आहे.” (CM Devendra Fadnavis)

११ नौदलच्या स्पीड बोट आणि ४ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून बचावकार्य
“नीलकमल आणि नौदलाची स्पीड बोट यांच्या झालेल्या या अपघातात १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. या १३ लोकांमध्ये १० नागरिक आहेत. तीन नौदलाचे कर्मचारी आहेत. दोन व्यक्ती गंभीर जखमी आहे. त्यांना नौदलाच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे. ११ नौदलच्या स्पीड बोट आणि ४ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सर्वांना वाचवण्यात आले आहे. संध्याकाळी ७.३० पर्यंत ही माहिती मिळाली आहे. अधिक माहिती गुरुवारी (१९ डिसेंबर) सकाळी मिळेल. कोणी मिसिंग असेल तर सकाळपर्यंत कळेल.” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.