अदानींनी जाहीर केला मागील चार वर्षांचा जमाखर्च; राहुल गांधींच्या टीकेला चोख उत्तर

104

उद्योगपती गौतम अदानी गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय बनले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी २० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवरून अदानी ग्रुपवर टीका केली होती. त्या टीकेला चोख उत्तर म्हणून आता अदानी समुहाने मागील चार वर्षांचा पूर्ण जमाखर्च जाहीर केला आहे.

अदानी समूहाने २०१९ पासून आपले शेअर्स विकून आतापर्यंत २.८७ बिलियन डॉलर्स म्हणजेच २३,५२५ कोटी कमावले. तसेच त्यातील २.५५ बिलियन डॉलर्सची पुन्हा गुंतवणूक केली. तसेच अबुधाबीमधील ग्लोबल स्ट्रेटेजिक इनव्हेस्टमेन्ट कंपनी आणि इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी यांमध्ये २.५९३ बिलियन डॉलर्स म्हणजेच २१,२५५ कोटी गुंतवणूक केली आहे. याचा वापर त्यांनी अदानी इंटरप्रायजेस लिमिटेड आणि अदानी एनर्जी लिमिटेडसाठी केला. तसेच अदानी टोटल गॅस लिमिटेड आणि अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे शेअर्स विकून २.७८३ अरब डॉलर्स म्हणजेच २२,८१२ कोटी रुपयांची कमाई केली. अदानी समूहाच्या या स्पष्टीकरणामुळे त्यांच्यावर टीका करणाऱ्या अनेक जणांना त्यांनी चोख उत्तर दिले आहे.

(हेही वाचा श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची माहिती प्रसारित करण्यास वृत्तवाहिन्यांना न्यायालयाची मनाई)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.