राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर उद्योगपती अदानी; चर्चेला उधाण 

149
श्रीमंतीच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या पाचमध्ये असलेले प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी मंगळवारी १० जानेवारी रोजी चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. या भेटीमागे नेमके काय कारण आहे, यावर आता तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली.

धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प अदानी यांच्याकडे

सध्या उद्योगपती गौतम अदानी हे नेहमी मोठ्या राजकीय नेत्यांच्या भेटी घेत असतात. त्यांचे विविध राजकीय नेत्यांशी संबंध आहेत. नुकतेच अदानी यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती, त्यानुसार आता गौतम अदानी हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी आले आहेत. राज ठाकरे यांनी मराठी तरुणांच्या नोकऱ्यांचा विषय काढला आहे. उद्योगांमध्ये मराठी तरुणांना संधी देण्याचा मुद्दा राज ठाकरे कायम मांडत असतात. तसेच मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे व्यवस्थापन अदानी यांच्याकडे आहे. त्याचबरोबर सध्या धारावी झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा अत्यंत महत्वाचा आणि मोठा प्रकल्प अदानी यांच्याकडे आला आहे. अशा सर्व विषयांपैकी कोणत्या विषयावर अदानी हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी आले आहेत, यावर तर्कवितर्क लढवणे सुरु झाले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.