आठवले का म्हणाले, शिवसेनेला भाजपशिवाय भवितव्य नाही

112

महाराष्ट्रात लोकसभेत शिवसेनेला 3-4 जागा तरी येतील की नाही ही शंका असून विधानसभेत तर त्यांचा पानिपतच होणार आहे. इतर राज्यात माझा राजकीय पक्ष हा शिवसेनेपेक्षा स्ट्राँग असून मणिपूरमध्ये माझ्या पक्षाचा उमेदवार फक्त १८३ मतांनी पराभूत झाला आहे, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. यासह ते पुढे असेही म्हटले की, शिवसेनेला भाजपशिवाय भवितव्य नाही.

काय म्हटले आठवले?

शिवसेनेला बाहेरच्या राज्यात यश मिळण्याचा प्रश्नच येत नाही असा दावा रामदास आठवलेंनी केला. “माझा पक्ष इतर राज्यात शिवसेनेपेक्षा स्ट्राँग आहे. मणिपूरमध्ये माझा उमेदवार फक्त 183 मतांनी पराभूत झाला आहे. महाराष्ट्रात लोकसभेत त्यांना 3-4 जागा तरी मिळतील की नाही ही शंका आहे. विधानसभेत तर त्यांचा पानिपतच होणार आहे,” असं आठवले म्हणाले.

(हेही वाचा – राज्यपालांकडे भाजप करणार सत्ता स्थापनेचा दावा!)

अजूनही वेळ गेलेली नाही, आठवलेंचा सूचक इशारा

“महाविकास आघाडीचे प्रचंड नुकसान होणार आहे. पवार साहेब जरी म्हणत असले तरी लोकांच्या मनात चित्र वेगळेच आहे. मागच्या वेळी त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. अजूनही वेळ गेलेली नाही शिवसेनेने अडीच-अडीच वर्ष फॉर्म्युलावर एकत्र यावं, शिवसेनेला भाजपशिवाय भवितव्य नाही,” असं रामदास आठवले यांनी सांगितलं. 2024 मध्ये सुद्धा भाजप आणि एनडीएचे सरकार येईल आणि मोदी पंतप्रधान होतील, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला. पुढे ते म्हणाले की, भाजपचा सामना करण्यासारखा एकही पक्ष राहिलेला नाही. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्त्वात काँग्रेस वाढेल अशी स्थिती नाही. राहुल गांधी यांच्याऐवजी उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांना पुढे करण्यात आले असले तरी त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे काँग्रेसला पुढे भवितव्य दिसत नाही, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.