स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध करण्याससह सर्वसामान्य जनतेला सावरकर यांचा इतिहास आणि त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाची माहिती देण्यासाठी भाजपा-शिवसेनेकडून ‘वीर सावरकर गौरव यात्रा’ काढली जात आहे. त्याला शह देण्यासाठी उद्धव सेनेकडून ‘घर घर सावरकर’ मोहीम हाती घेतली जाणार असल्याचे कळते.
( हेही वाचा : ‘मी सावरकर’ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात ५ एप्रिल रोजी विशेष कार्यक्रम)
घर घर सावरकर’ मोहीम
भाजपा-शिवसेनेकडून ३० मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत राज्यातील २८८ मतदार संघात सावरकर गौरव यात्रा काढली जाणार आहे. राज्यातील विविध भागांतून सर्वसामान्य नागरिकांचा या यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ही बाब लक्षात घेऊन मतांची फाटाफूट रोखण्यासाठी उद्धव सेनेनेही ‘घर घर सावरकर’ मोहीम हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील सुप्रसिद्ध व्याख्यात्यांना निमंत्रण देणार
मातोश्रीवर नुकतीच त्यासंदर्भात प्रमुख नेत्यांची बैठक झाली. ‘घर घर सावरकर’ मोहिमेचे स्वरूप कसे असावे, याबाबत बैठकीत चर्चा झाली. यात्रेऐवजी व्याख्यानांच्या माध्यमातून सावरकरांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवा, असे निर्देश उद्धव ठाकरेंनी दिल्याचे कळते. त्यासाठी राज्यातील सुप्रसिद्ध व्याख्यात्यांना निमंत्रण दिले जाणार आहे. या संपूर्ण मोहिमेची रूपरेषा निश्चित झाल्यानंतर तारीख घोषित केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
Join Our WhatsApp Community