राहुल गांधी यांनी गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांना काँग्रेस सोडून जाण्यासाठी एकप्रकारे भाष्य केले होते. शेवटी आझाद यांना पक्ष सोडावा लागला. मात्र आता गुलाम नबी आझाद यांना काँग्रेसमध्ये परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. लोकनेत्यापुढे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना शरणागती पत्करावी लागली असल्याची चर्चा सुरु आहे. जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसमध्ये यावे यासाठी प्रयत्न सुरु आहेत. एकीकडे, आझाद यांची मनधरणी सुरु आहे तर दुसरीकडे आझाद आपल्या पक्षाचे विलीनीकरण करण्याची तयारी करीत असल्याची अफवा पसरविली जात आहे.
जम्मू-काश्मीरातील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून जम्मू-काश्मीरातील राजकीय वातावरणाच्या हालचाली वाढल्या आहेत. ज्येष्ठ नेते ताज मोहिउद्दीन यांनी रविवारी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी (डीपीएपी) सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा केली आहे. यानंतर आझाद (Ghulam Nabi Azad) डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी काँग्रेसमध्ये विलीन करीत असल्याची चर्चा सुरु आहे. रविवारपासून राजकीय वर्तुळात गुलाम नबी आझाद यांच्या ‘घरवापसी’ (काँग्रेस) बद्दलच्या अटकळांना उधाण आले.
(हेही वाचा – Kolkata Doctor Case : डॉक्टरांना जगू द्या! कोलकाता प्रकरणावर आयएमए अध्यक्षांचे भावनिक पत्र)
काँग्रेसच्या अफवांना बळी पडू नका – आझाद
मात्र, सायंकाळी उशिरा आझाद (Ghulam Nabi Azad) यांच्या पक्षाने ही अफवा असल्याचे सांगत सर्व शक्यता फेटाळून लावल्या. काँग्रेस हा विरोधी पक्ष डीपीएपी फोडण्याचा कट रचत असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीनंतर डीपीएपीची कामे जवळपास ठप्प झाली आहेत. २०२२ मध्ये आझाद यांनी काँग्रेसपासून वेगळे होऊन डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. लोकसभा निवडणुकीत डीपीएपीची कामगिरी निराशाजनक होती.
पक्षाचे मुख्य प्रवक्ते सलमान निजामी यांनी एक वक्तव्य जारी केले. ते म्हणाले की, काँग्रेस नेते दोन आठवड्यांपासून अफवा पसरवत आहेत की, गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) आणि त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांच्या वतीने ते म्हणाले की, आझाद यांनी काँग्रेस सोडल्यापासून त्यांनी कोणत्याही काँग्रेस नेत्याशी संपर्क केलेला नाही. पक्ष फोडण्यासाठी आणि संभ्रम निर्माण करण्यासाठीच या अफवा पसरवल्या जात आहेत. काँग्रेसच्या अफवांना बळी पडू नका, असे आझाद यांनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सांगितले. आझाद काँग्रेसमध्ये असताना ते जी २३ गटाचे सदस्य होते. पक्षात लोकशाही नांदवी अशी त्यांची मागणी होती. गांधी कुटुंबाला मात्र ही बाब फार जिव्हारी लागली होती. यामुळे आझाद यांचा कोंडमारा सुरु झाला. शेवटी कंटाळून आझाद यांनी काँग्रेस सोडली. मात्र आता काँग्रेस त्यांची मनधरणी करताना दिसत आहे. (Rahul Gandhi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community