गुलाब नबी आझाद दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर; धमकीचे पोस्टरच केले शेअर

147

जम्मू-काश्मीरच्या राजकारणात आपली नवी इनिंग सुरू करणारे काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद यांना दहशतवादी संघटनेकडून धमकी देण्यात आली आहे. लष्कर-ए-तैयबाशी संलग्न असलेल्या द रेझिस्टन्स फ्रंट (TRF) या संघटनेने ही धमकी दिली आहे. दहशतवादी संघटनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर धमकीचे पोस्टर जारी केले आहे.

(हेही वाचा – नाशिकच्या पिंपळगाव बसवंत टोलनाक्यावर दोन महिलांध्ये तुफान राडा, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल)

दहशतवादी संघटनेकडून म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरच्या राजकारणात गुलाम नबी आझाद यांचा प्रवेश अचानक झालेला नाही, तर ती जाणीवपूर्वक आणि विचार करून त्यांनी राजकारणात आता सहभाग घेतला आहे, हे त्यांनी कॉंग्रेसमध्ये असतानाच ठरवले होते, असे पोस्टर दहशतवादी संघटनेने जारी केले आहे. आझादांच्या नव्या राजकीय वाटचालीची सुरूवात होण्याआधी भाजपचे विरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बंद दाराआड बैठक घेतली होती. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबतही बैठक घेतली आहे.

दहशतवादी संघटनेकडून जे पोस्टर जारी करण्यात आले त्यामध्ये, त्यांनी असे म्हटले की, भाजपकडून आपल्या राजकीय अजेंड्यासाठी विस्थापित काश्मिरी पंडितांचा वापर केला जात असल्याचेही त्यामध्ये म्हटले आहे. नुकतेच गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस सोडून नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली आहे. सध्या त्यांचा पक्ष जम्मू-काश्मीरच्या राजकारणावर लक्ष केंद्रित करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. नुकतेच त्यांनी बारामुल्ला येथून ‘मिशन काश्मीर’ सुरू केले असून यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीत त्यांनी कलम 370 बाबतही मोठी गोष्ट सांगितली. यावेळी आझाद म्हणाले होते की, माझ्यावर असा आरोप आहे की विरोधी पक्षनेता असल्याने मी कलम 370 परत लागू करू शकत नाही, तर मला संसदेत संख्याबळ कुठून मिळणार? राजकीय फायद्यासाठी मी लोकांना कधीच मूर्ख बनवत नाही, माझ्यासाठी जे शक्य नाही ते मी कधीही वचन देत नाही, असेही त्यांनी सांगितले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.