राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर संपकरी एसटी कामगारांनी हल्ला केला. या हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी अटक केली होती, मागील दोन वेळा सदावर्ते यांना पोलिसांनी ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती, त्यानंतर बुधवारी, १३ एप्रिल रोजी सदावर्ते यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सदावर्ते यांना पोलीस कोठडी सुनावण्याची मागणी केली होती, मात्र न्यायालयाने ही मागणी अमान्य करत सदावर्ते यांना गिरगाव न्यायालयाच्या एन ए पटेल यांच्या खंडपीठाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तर सातारा पोलिसांना सदावर्ते यांचा ताबा देण्यास परवानगी दिली आहे, मात्र तेथील पोलिसांना त्याकरता तेथील न्यायालयात अर्ज करावा लागणार आहे.
७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी
या प्रकरणात सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना आरोपी बनवण्यात आले आहे. एसटी कामगारांकडून सदावर्ते यांनी ३ कोटीहून अधिक रकम जमवली आहे. त्यातील ८० लाख रुपये जयश्री पाटील यांच्याकडे होते. सध्या जयश्री पाटील फरार आहेत, असे सरकारी वकील प्रदीप घरत यांनी सांगितले. पवारांच्या घरावर हल्ला सुनियोजित होता, त्यासाठी सदावर्ते यांच्या घरत बैठक झाली होती, त्यांच्या डायरीत सगळं तपशील आहे, यात पैशाचा व्यवहार झाला आहे, त्यामुळे या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्याची आवश्यकता आहे, असे प्रदीप घरत यांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे सदावर्ते यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी हवी आहे, असे वकील प्रदिप घरात म्हणाले. ते म्हणाले. त्यावर गुणरत्न सदावर्ते याचे वकील यांनी याला विरोध करत सदावर्ते यांचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तसेच त्यांच्या मागील ४ दिवस सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात होते, असे म्हणाले. त्यानंतर न्यायालयाने सदावर्ते यांना १४ दिवसांची नायालयीन कोठडी सुनावली.
(हेही वाचा नवाब मलिकांच्या ८ मालमत्ता ईडीकडून जप्त)
Join Our WhatsApp Community