राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट या तीनही पक्षांचा एकत्रितरित्या मेळावा पार पडला. भाजपचे नेते आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आणखी नव्या भूकंपाचे संकेत दिले आहेत. फक्त १५ दिवस राज्यात आणखी प्रचंड मोठे भूकंप होणार आहेत. येत्या काळात कॉंग्रेसच नव्हे, तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाला आणखी धक्के बसणार असल्याचा दावा गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला आहे.
काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांकडूनच असे दावे केले जात आहेत. राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ उडाली आहे.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी मीडियाशी संवाद साधताना हे संकेत दिले आहेत. मी तुम्हाला बोललो होतो की, राजकारणात मोठे मोठे भूकंप होतील. त्याप्रमाणे रविवारी, (१४ जानेवारी) काँग्रेसचे मिलिंद देवरा यांचा शिवसेनेत प्रवेश झाला आहे. पुढे अजूनही मोठे भूकंप होतील, असं वक्तव्य भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी केले असून आगामी काळात आणखी मोठे राजकीय प्रवेश होण्याचे संकेत व्यक्त केले आहेत. पुढच्या 15 दिवसात आपल्याला अपेक्षित नाही अशी लोक भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतील, असं मोठं विधान गिरीश महाजन यांनी केलं आहे.
जळगावातील श्रीकृष्ण लॉनमध्ये मेळावा…
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर जळगाव जिल्ह्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट या तीनही पक्षांचा एकत्रितरित्या मेळावा पार पडला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगावातील श्रीकृष्ण लॉनमध्ये हा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे गुलाबराव पाटील, भाजपचे मंत्री गिरीश महाजन, राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील या तिघांची उपस्थिती होती. यावेळी गिरीश महाजन यांनी हे संकेत दिले.
हेही पहा –