भाजपा नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे तसेच ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते यांना मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. खडसे यांनी महाजन यांच्यावर एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला होता, तर थत्ते यांनी एका व्हायरल व्हिडिओद्वारे यासंदर्भातील दावे प्रसारित केले होते. या आरोपांमुळे महाजन (Girish Mahajan) यांची प्रतिमा डागाळल्याचा दावा त्यांनी केला आहे.
खडसे यांनी दावा केला होता की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाजन यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यापूर्वी त्यांच्या कथित संबंधांबाबत विचारणा केली होती. या आरोपांना महाजन (Girish Mahajan) यांनी खोटे ठरवत खडसे यांना पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले आहे. “खडसे यांनी बिनबुडाचे आरोप केले. जर त्यांच्याकडे पुरावा असेल, तर मी राजकारणातून संन्यास घेईन,” असे महाजन यांनी म्हटले आहे. तसेच, थत्ते यांनी व्हिडिओद्वारे या प्रकरणाला चिथावणी दिल्याचा आरोपही त्यांनी केला.
खडसे यांनी प्रत्युत्तरात म्हटले, “माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. मी कोर्टात सत्य समोर आणेन.” दरम्यान, अनिल थत्ते यांनी नोटीशीवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, पत्रकार म्हणून त्यांनी फक्त माहिती प्रसारित केली. राजकीय विश्लेषकांच्या मते, खडसे आणि महाजन (Girish Mahajan) यांच्यातील जुने वैर या प्रकरणामुळे पुन्हा पेटले आहे. या नोटीशीमुळे जळगावच्या राजकारणात खळबळ उडाली असून, आगामी काळात याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
Join Our WhatsApp Community