Manoj Jarange Patil : सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्रे देण्याचा अध्यादेश रात्रीपर्यंत द्या, नाहीतर आझाद मैदान गाठणार; मनोज जरांगे पाटील

सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्रे देण्याचा अध्यादेश काढला तरी आझाद मैदानात गुलाल उधळायला जाणार, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

273

मराठा समाजाच्या कुणबी म्हणून ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्याही सगेसोयऱ्यांनाही प्रमाणपत्रे देण्यात यावेत, तसा अध्यादेश सरकारने शुक्रवार, २६ जानेवारी र्जी रात्रीपर्यंत काढावा, आम्ही तुम्हाला शनिवार, २७ जानेवारीपर्यंतची मुदत देत आहोत. नाही तर आम्ही शनिवारी आझाद मैदान गाठणार आहे. अध्यादेश काढला तरी आझाद मैदानात गुलाल उधळवायला जाणार आहे, असे मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी वाशी येथे मराठा आंदोलकांना संबोधित करताना म्हटले.

नोंदी जाणून घेण्यासाठी अर्ज करा 

शासनाने आमच्याशी चर्चा केली. जातीच्या पदरात गुलाल टाकायला आलो आहे. चर्चेत मंत्री कुणी आले नव्हते, सचिव सुमंत भांगे आले होते. चर्चेचा सारांश घेऊन आले होते. सकाळी त्यांनी सांगितले होते, पण अर्धवट वाचले होते. सरकारने त्यांच्या बद्दलची भूमिका सांगितली. आपले म्हणजे आहे ५४ लाख नोंदी मराठ्यांच्या खरेच सापडल्या तर त्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटून द्या, त्या नोंद नेमक्या कुणाच्या आहेत हे माहित करायचे असेल तर त्या ग्रामपंचायतीला कागद चिटकवावा लागेल, त्यासाठी ते प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज करावा. सरकार म्हणते काही जणांनी अर्ज केला नाही, मग त्यांनी त्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये शिबीरे घ्यावीत, तशी शिबिरे घ्यायला सरकारने सुरुवात केली आहे. आता अर्ज करा, तुमच्या परिवाराने अर्ज करावा, नोंदी शोधण्यासाठी मदत करा. तुम्ही अर्जच केला नाही तर प्रमाणपत्र कसे मिळणार? तातडीने अर्ज करायला सुरुवात करा, असे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.

२ कोटी मराठा समाजाला आरक्षण मिळाले 

५४ लाख मराठा बांधवाना प्रमाणपत्रे मिळतील, दुसरा विषय ज्या नोंदी मिळाल्या त्या बांधवाच्या सगळ्या परिवाराला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, एका नोंदीवर कुणाला ७०, कुणाला २०० जणांना फायदा होत आहे. आपण सरासरी ५ जरी ठरवेल तरी २ कोटी मराठा समाज आरक्षणासाठी पात्र ठरेल. वंशावळी जुळण्यासाठी सरकारने शासन निर्णय काढला आहे. सामान्य प्रशासनाचे सचिव सांगत आहेत की, ५७ लाख नोंदी मिळाल्या आहेत. ३७ लाख लोकांना प्रमाणपत्रे वितरित केले आहेत, असेही सरकारने सांगितले आहे. त्यांच्याकडून यादी घेतली आहे. त्याचेही पत्रे दिले आहे. बाकीच्यांना का दिले नाही, कारण त्यांची वंशावळी जुळवण्यातही काम सुरु केले आहे. ज्या मराठा समाजाला प्रमाणपत्रे मिळाले आहेत त्यांचा डेटा मागितला आहे. हे या आंदोलनामुळे शक्य झाले आहे, असेही जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.

(हेही वाचा Maratha Reservation : सरकारच्या शिष्टमंडळासोबत बैठक; मनोज जरांगे भूमिका स्पष्ट करणार)

शिंदे समितीला मुदत वाढ दिली 

दुसरे शिंदे समिती रद्द करायची नाही, त्या समितीने नोंदी शोधण्याचे काम सुरूच ठेवा, तिची २ महिन्यांची मुदत वाढवली आहे. टप्याटप्याने मुदत वाढवली जाणार आहे. ज्याची नोंद मिळाली त्याच्या सर्व सगेसोयऱ्यांना प्रमाणपत्र द्यायचे त्याचा अध्यादेश काढा अशी मागणी केली आहे. ५४ लाख नोंदी अधिक त्या बांधवाच्या परिवारातील कुटुंबे आणि त्यांची सगेसोयरे यांना प्रमाणपत्रे द्यायचे, त्यासाठी प्रमाणपत्र मिळालेल्या बांधवाने शपथपत्र लिहून अमुक हा सोयरा आहे, असे लिहून द्यायचे. त्या शपथपत्रावर प्रमाणपत्र द्यायचे. ते शपथपत्रही मोफत करून घ्यावे. अंतरवालीसह सर्व भागातील गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी केली. मात्र गृहमंत्रालयाने कायदेशीर बाबी पाहून करण्यात येतील, असे (Manoj Jarange Patil) म्हटले आहे.

आरक्षण मिळेपर्यंत मोफत शिक्षण द्यावे 

क्युरिटी पिटिशनचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. आरक्षण आणि सगेसोयरे यातून कुणी बाजूला राहिला तर त्यासाठी मागणी केली की, शंभर टक्के आरक्षण मिळेपर्यंत सगळ्या मराठा समाजाला १०० टक्के मोफत शिक्षण देण्यात यावे, त्याचा शासकीय निर्णय येणार आहे, असेही जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.

आरक्षण मिळेपर्यंत भरती थांबवा 

सरकारी भरत्या आरक्षण मिळेपर्यंत करायच्या नाही, जर शासकीय भरती करायची असेल तर आमच्या जागा राखीव जागा सोडून भरा. जिल्हा स्तरावर वसतिगृहाची मागणी केली होती. त्यावरही निर्णय घेणार आहे, असे सांगितले आहे. आर्थिकदृष्ट्या मागास आरक्षणाखाली ज्या मुलांना नोकऱ्या दिल्या त्यांना दिल्या नाही, त्या ९२० जणांना एमपीएससी च्या माध्यमातून नोकऱ्या दिल्या आहेत. त्या उमेदवाऱ्यांना नोकऱ्या देण्यासाठी १५०० जागा निर्माण केल्या आहे, कोरोनात ३ हजार जणांना सामावून घेण्यात आले आहे. एकूण ४ हजार नोकऱ्या देण्यात आल्या असल्याचे सरकारने सांगितले असल्याचे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले.

आज मुक्काम वाशीत 

मायबाप समाजाचा विश्वास जिंकावा लागतो त्यावेळी हा समाज जीव द्यायलाही मागे पुढे पाहत नाही. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या आहेत तर मग हैद्राबामधील १८५४ चे गॅझेट लागू करा. आता एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहणार नाही. सगेसोयऱ्याचा शासननिर्णय अजून झाला नाही. आम्हाला मुंबईत येण्याची हौस नाही. तुम्ही आजच्या रात्री हा अध्यादेश द्यावा. आजची रात्र इथेच वाशीत काढतो. २६ जानेवारीचा सन्मान करून आम्ही आझाद मैदानात जात नाही, पण मुंबई आम्ही सोडत नाही. नाहीतर मी उद्या आझाद मैदानात जाणार आहे. सकाळी ११ वाजल्यापासून उपोषण सुरु केले आहे. फक्त पाणी पितोय तेही सोडायला तयार आहे. जर एखाद्या मुलाला त्रास दिला तर राज्यातील मराठा समाज झाडून पुसून मुंबई येईल. अध्यादेश काढला तरी आझाद मैदानात गुलाल उधळायला जाणार आंही दिला तरी आझाद मैदानात जणार आहे, असे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)  म्हणाले.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.